देशातील आर्थिक विकासदर ढासळत चालला आहे - पृथ्वीराज चव्हाण

हुकूम मुलाणी
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

मंगळवेढा - देशातील आर्थिक विकासदर ढासळत चालला असून, काँग्रेसला देशातील जनतेची चिंता असून पुन्हा मोदीला संधी देणे म्हणजे हुकूमशाहीला संधी दिल्यासारखे असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

मंगळवेढा - देशातील आर्थिक विकासदर ढासळत चालला असून, काँग्रेसला देशातील जनतेची चिंता असून पुन्हा मोदीला संधी देणे म्हणजे हुकूमशाहीला संधी दिल्यासारखे असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. काँग्रेसने शेतकरी, कामगार, आरक्षण, सर्वसामान्याचे प्रश्न घेवून रस्त्यावर येवून सुरू केलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या मंगळवेढा येथील बाजार चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सतेज पाटील, प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात, माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील, आ.रामही रूपनर, सचिन सावंत, आ.भारत भालके, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, नगराध्यक्षा अरूणा माळी, उपनगराध्य चंद्रकांत घुले, सुरेश कोळेकर, मारूती वाकडे, संकेत खटके, महेश दत्तू, युवराज शिंदे, पांडुरंग चौगुले, दिलीप जाधव, आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की सत्ताधारी पक्षाने निवडणूकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासने पाळाली नाहीत. सत्ता मिळाल्यावर जनतेला विसरले. आम्ही मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षण दिले, तालुक्यातील ३५ गावची योजना व भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करून १० कोटी रुपयांचे साखळी बंधारे बांधले असल्याचे म्हणाले अध्यक्ष सचिन सावंत म्हणाले की सत्ताधारी भाजप व शिवसेना हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून जे सत्ताधारी निवडणूकीपूर्वी अबकी बार मोदी सरकार म्हणायचे आणि सत्ता मिळताच अबकी बार महिलांना मार अशी अवस्था झाली. आगामी काळात काँग्रेस व मित्र पक्षाचे आमदार वाढले पाहिजेत यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 

यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आ.रामहरी रूपनर, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, रामहरी रूपनर, आ.भारत भालके, अॅड.नंदकुमार पवार, याची भाषणे झाली. सूत्रसंचालन बालाजी शिंदे, भारत मुढे यांनी केले तर आभार काँग्रेस शहराध्यक्ष मारुती वाकडे यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Economic growth in the country is going down - Prithviraj Chavan