आता राज्यातील शाळा होणार लवकरच कलरफुल

मिलिंद देसाई
Thursday, 10 September 2020

शाळांना सुरुवात होण्यापूर्वी शाळेत रंगकाम करा, शिक्षण खात्याची सूचना 

बेळगाव : शाळांना सुरुवात होण्यापूर्वी राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये रंगकाम करावे अशी सूचना शिक्षण खात्यातर्फे करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व शाळांना लवकरच रंगकाम हाती घ्यावे लागणार आहे. 

कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास मोठा विलंब झाला आहे त्यामुळे शाळा कधीपासून सुरू होणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र ज्यावेळी शाळा सुरू होतील त्यावेळी विद्यार्थांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी सरकारी शाळांमध्ये चांगल्या प्रकारे रंगकाम केले जावे अशी सुचना करण्यात आली असून दरवर्षी शाळांना दुरुस्ती आणि इतर कामांसाठी अनुदान देण्यात येते त्या अनुदानातून शाळांनी रंगकाम करावे लागणार आहे. 

29 मे पासून शाळांना सुरुवात होणार होती. मात्र कोरोनाच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे अजून शाळा सुरूवात झालेली नाही. मात्र 21 सप्टेंबरपासून 9 ते 12 वीच्या विध्यार्थ्यांना शाळेत येण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक दिवसानंतर विध्यार्थी शाळेत परतणार आहेत. 

हेही वाचा- शंभराहून अधिक नाल्याचे अस्तित्वच गायब ; काय आहे हे प्रकरण

कोरोनामुळे निर्माण झालेले नैराश्य दूर व्हावे आणि शाळेतील वातावरण आंनदी रहावे यासाठी रंगकाम करण्याचे काम हाती घ्या अशी सूचना करण्यात आली असली तरी रंगाचे दर अधिक असल्याने शिक्षण खात्याने रंगकामासाठी अधिक प्रमाणात अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शाळांकडून होण्याची शक्यता आहे. शाळांना दुरुस्ती कामासाठी देण्यात येणारे अनुदान कमी असल्याने त्यामधून सर्व शाळेला रंगकाम करणे शक्य होणार नाही अशी असे मत शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा- खमक्‍या आज्जी पुन्हा झाल्‍या ठणठणीत...! : १०३ व्या वर्षी जिंकली लढाई

शाळांमध्ये रंगकाम करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार शाळांना माहिती दिली जाणार आहे. शाळा कधीपासून सुरू होतील याबाबत अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही 

अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education department has directed all government schools in the state to do painting work.