सातारा येथे शिक्षणाधिकाऱ्याला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

शिक्षणाधिकाऱ्यालाच लाच घेताना पकडण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

सातारा- फरक बिलाची रक्कम मंजुर करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. शिक्षणाधिकाऱ्यालाच लाच घेताना पकडण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

संबंधित तक्रारदाराने फरक बिलाची रक्कम मिळण्यासाठी जिल्हापरिषदेत अर्ज केला होता. ही रक्कम मिळवून देण्यासाठी श्रीमती गुरव यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पडताळणीमध्ये तडजोडी अंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार दहा हजार रुपयांची रक्कम घेताना श्रीमती गुरव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याबाबतची माहिती मिळाल्यावर संपूर्ण शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Education Officer arrested For taking bribe in satara