सांगली, मिरजेत ईद उत्साहात साजरी

संयोजन शाही इदगाह जामा मशीद इन्तजाम कमिटीने केले.
 ईद उत्साहात साजरी
ईद उत्साहात साजरीesakal

सांगली/मिरज : पवित्र रमजान महिन्यातील उपवासानंतर आज रमजान ईद सांगली, मिरजेसह जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त दोन्ही शहरांत नमाज पठणाचा मुख्य कार्यक्रम ईदगाहवर झाला. सांगली शहरातील मुख्य सार्वजनिक नमाज पठणाचे आयोजन जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाहवर करण्यात आले. मिरजेतील प्रमुख ईदगाह मैदानावर सकाळी मुख्य नमाज पठण झाले.

मिरजेत बुऱ्हानुद्दीन खतीब यांनी खुदबा पठण केले. दर्ग्याचे पेशइमाम कारी इरफान बरकाती यांनी नमाज पठण केले. संयोजन शाही इदगाह जामा मशीद इन्तजाम कमिटीने केले. ईदच्या नमाजसाठी आलेल्या बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक दीिक्षतकुमार गेडाम, विशाल पाटील, तहसीलदार डी. एस. कुंभार, पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर, सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, अय्याज नायकवडी, सुरेश आवटी, प्रमोद इनामदार यांच्यासह मिरजेतील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मिरजेतील ख्वॉजा मिरासाहेब दर्गा आणि अन्य दर्गा, मशिदींतही विशेष प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले.

सांगलीत मुफ्ती इम्रान यांनी नमाज पठण यांनी केले. हाफिज सद्दाम यांनी खुदबा पठण केले. नमाज पठणाची माहिती मुफ्ती साद यांनी दिली. माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, अस्लम बागवान, इरफान शिकलगार, महमंद ऊर्फ लालू मिस्त्री, युसूफ जमादार यांनी याचे केले. मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी श्रीमती जयश्री पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह पोलिस अधीक्षक गेडाम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले, पोलिस उपाधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक अजित सिंदकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com