जिंतीतून 6 लाखांच्या आठ म्हशी चोरीला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

उंडाळे - जिंती ता कराड येथून दि 20 रोजी रात्री 12 ते 2 च्या दरम्यान आकाईची वाडी फाटा येथील वस्ती वरून पाच शेतकऱ्यांच्या आठ म्हशी चोरीला गेल्या. 

रघुनाथ बालकू पाटील, काशीनाथ बालकू पाटील, रामचंद्र विठ्ठल पाटील, संतोष भगवान पाटील, संपत बापू पाटील या शेतकऱ्याच्या सुमारे 6 लाख रुपये किमंतीच्या म्हशी होत्या. या शेतकऱ्याचे म्हशीचे संपूर्ण गोठेच चोरत्यानी मोकळे केले आहेत.

आयशर टेंपोतून या म्हशी पळवण्यात आल्या असून, त्याचे फुटेज उंडाळे येथील सीसीटिव्हीमध्ये आढळून आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: eight buffaloes are stolen from jintur