खेड्यातील पावणेआठ लाख जणांची तपासणी : जितेंद्र डुडी... ग्रामिण भागात साडेपाच हजार जणांवर घरीच उपचार 

अजित झळके
Monday, 14 September 2020

सांगली-  जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात पाच फेऱ्यांमध्ये 7 लाख 73 हजाराहून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी झाली. त्यात 3 हजार 506 लोक कोरोना बाधित आढळले. त्यातील 70 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्णांना कोणतेही लक्षण दिसत नव्हते. मात्र वेळीच तपासणी झाल्याने त्यांच्यावर उपचार करणे शक्‍य झाले. त्यांना घरी विलगीकरण करण्यात आल्याने त्यांच्यापासून होणारा संसर्ग रोखता आला, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. 

ते म्हणाले, "" जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्या निरीक्षणात ही मोहिम सुरु आहे. कोविड मदत केंद्र, कॉल सेंटर, होम आयसोलेट कॉल सेंटर, टेलीमेडिसीन कॉल सेंटर हे कक्ष कार्यरत आहेत. त्यातून रुग्णांची देखभाल, संवाद, समुपदेशन सारे सुरु आहे. मेपासून ताप, सर्दी, खोकला असलेल्या 3340 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 212 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. पैकी 52 बाधितांची नोंद झाली. श्वास घेण्यास त्रास व धाप लागणाऱ्या 2235 रुग्णांची तपासणीतून 812 रुग्ण बाधित आढळते.'' 

ते म्हणाले, ""या रुग्णांना तातडीने उपचार दिले जात आहेत. उपलब्ध खाटांची माहिती फोनवरून दिली जाते. 29 जुलैपासून आतापर्यंत 2 हजार 272 फोन आले. 1600 रुग्णांना तत्काळ बेड उपलब्ध करून देता आला. सप्टेंबरपर्यंत घरी राहून 5 हजार 609 जणांनी उपचार घेतले. 2 हजार 858 रुग्ण बरे झाले. होम आयसोलेटेड ऍक्‍टिव्ह रुग्ण 2 हजार 700 असून हॉस्पिटलमध्ये 51 दाखल आहेत.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight lakh people examined in rural areas: Jitendra Dudi