स्थायीच्या रिक्त आठ सदस्यांची निवड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

कोल्हापूर - महापालिकेच्या स्थायी समितीत रिक्त झालेल्या आठ सदस्यांची नियुक्ती आज करण्यात आली. यामध्ये कॉंग्रेसकडून संदीप नेजदार व राहुल माने या दोघांचाही समावेश करण्यात आला आहे. सभापतिपदासाठी कॉंग्रेसकडून संदीप नेजदार यांचे नाव निश्‍चित झाले आहे. महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. 

स्थायी समितीचे आठ सदस्य चिठ्‌ठीद्वारे निवृत्त झाले होते. यामध्ये कॉंग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे तीन, भाजप-ताराराणीच्या तिघांचा समावेश होता. या पक्षांचे तितकेच सदस्य आज स्थायीत नव्याने समाविष्ट करण्यात आले. सभा सुरू होताच गटनेत्यांनी आपली नावे महापौर हसीना फरास यांच्याकडे दिली. त्यानुसार कॉंग्रेसकडून डॉ. संदीप नेजदार व राहुल माने, राष्ट्रवादीकडून अजिंक्‍य चव्हाण, अफजल पिरजादे, मेघा पाटील यांची नावे समाविष्ट करण्यात आली. तर भाजप-ताराराणी आघाडीकडून आशीष ढवळे, सुनंदा मोहिते, कविता माने यांची नावे देण्यात आली. कॉंग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, भाजपचे विजय सूर्यवंशी व ताराराणी आघाडीचे सत्यजित कदम यांनी ही नावे दिली. त्यानंतर नावे निश्‍चित करण्यात आली. 

शिवसेनेकडे लक्ष 
स्थायी समितीत दोन्ही कॉंग्रेसचे 8 तर भाजप-ताराराणीचे 7 सदस्य आहेत. शिवसेनेकडे एक जागा आहे. 16 सदस्यसंख्या असलेल्या समितीत सत्तेचे पारडे कोणाकडे झुकवायचे, याची किल्ली मात्र शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सदस्यांना मोठे महत्त्व आहे. शिवसेनेकडून प्रतिज्ञा निल्ले या समितीत काम करतात. 

महिला बालकल्याणच्या समितीची निवड 
महिला बालकल्याण समितीवरही 9 सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये छाया पोवार, वहिदा सौदागर, माधुरी लाड, सूरमंजिरी लाटकर, दीपा मगदूम, गीता गुरव, सीमा कदम व अर्चना पागर यांचा समावेश आहे. महिला बालकल्याण समितीमध्ये आता राष्ट्रवादीचा सभापती होणार आहे. या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Eight members of the Standing committee