एकादशी निमित्त मिरज- बिदर पॅसेंजर गाडी धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरज- बिदर पॅसेंजर गाडी धावणार

एकादशी निमित्त मिरज- बिदर पॅसेंजर गाडी धावणार

मिरज : पंढरपुरच्या कार्तिकी वारीनिमित्त रेल्वे प्रशासनाकडून मिरज-बिदर गाडी क्रमांक (०७५१८) आणि बिदर-मिरज गाडी क्रमांक (०७५१७) ही नवी एकदिवसीय पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू करण्यात आली आहे. ती मिरज-पंढरपूर-बिदर मार्गावर धावेल या गाडीस प्रमुख स्थानकांवर थाबे देण्यात आले आहेत. यामुळे गेली दोन वर्षे पंढरीची आस धरलेल्या वारक-यांच्या विठ्ठल दर्शनाची सोय होणार आहे. ही गाडी पुर्णता पॅसेंजर म्हणून धावणार असलीतरी कोरोना नियमानुसार तिकीट हे आरक्षित आणि आॅनलाईन पध्दतीने मिळणार आहे.

हेही वाचा: कोल्हापूर : ज्येष्ठांसह गर्भवतींना अंबाबाई दर्शनाची मुभा

या गाडीच्या सर्व बोगी सामान्य (सीटींग) पध्दतीने प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहेत. या गाडीचे आरक्षण आॅनलाईन रेल्वेच्या संकेत स्थळावर तसेच मिरज रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर उपलब्ध आहे. बिदर येथून (ता.१४) रोजी दुपारी २ वाजून ११ मिनीटांनी सुटेल पंढरपूर येथे दुस-या दिवशी (ता.१५) रोजी सकाळी ७ वाजून १५ पोहचून पुढे मिरजेकडे रवाना होईल तर मिरज स्थानाकात १० वाजता पोहचेल. मिरजेतून (ता.१५) रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनीटांनी पंढरपुरसाठी पुन्हा धावणार आहे. पंढरपुर स्थानकातील पाच तासांच्या विश्रांतीनंतर ही गाडी पुढे बिदरकडे रवाना होईल.

ही गाडी ढालगाव येथे १ वाजून २३ मिनीटे, जतरोड १ वाजून ५८ मिनीटे, सांगोला २ वाजून ४७ मिनीटे, पंढरपुर ३ वाजून ५० मिनीटांनी पोहचेल (पाच तासांची विश्रांतीनंतर), कुर्डूवाडी रात्री ८ वाजून ४५ मिनीटे, बार्शी ९ वाजून २५ मिनीटे, उस्मानाबाद १० वाजून २५ मिनीटे, लातूर, मध्यरात्री १२ वाजून ५५ मिनीटे, लातूर रोड रात्री २ वाजता, उदगीर रात्री २ वाजून ४५ मिनीटे, कमलनगर ३ वाजून ४० मिनीटे, भालकी पहाटे ४ वाजता आणि बिदर स्थानकात पहाटे पाच वाजता पोहचेल. सदर गाडीस स्लिपर बोगी नसून सीटींग व्यवस्था करण्यात आली आहे.

loading image
go to top