पर्यटकांना खुणावतोय एकीवचा धबधबा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

कास - जावळी तालुक्‍याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले असून पावसाळ्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर बरसणाऱ्या धो-धो पावसामुळे ओसंडून वाहणारे धबधबे दिसतात. त्यातलाच एक धबधबा म्हणजे मेढ्याच्या पश्‍चिमेला असलेला एकीवचा धबधबा. दोन टप्प्यांत हा धबधबा कोसळत असल्याने तो पर्यटकांवर मोहिनी टाकतो. 

कासकडून येणाऱ्या पाण्याने हा धबधबा तयार झाला आहे. एकीवच्या अगदी मध्यभागी हा धबधबा असून एकीवमधून तो दुंद गावाच्या वरच्या बाजूला कोसळत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना कोणताही त्रास पडत नाही. 

पर्यटनासाठी कासला जाताना अगदी जवळच हा धबधबा असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. गेला आठवडाभर जावळी तालुक्‍यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने हा धबधबा ओसंडून कोसळत आहे. पंचक्रोशीत या धबधब्याला ‘पाबळ’ नावाने संबोधले जाते. या धबधब्याच्या वरच्या भागात काळजी घेऊन भिजता येते. मात्र, खालचा कोसळणारा भाग दुरूनच पाहावा लागतो. तरीही धबधबा पाहताना पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. 

कसे जाल...
मेढ्यातून कुसुंबी-दुंदमार्गे एकीवला जाता येते. तर साताऱ्याकडून आल्यास कास रस्त्यावर आटाळी गावाजवळून एकीवला रस्ता गेला आहे. दोन्ही रस्ते सुस्थितीत असून जाताना कण्हेर धरणाचे आणि डोंगरदऱ्यांचे विहंगम दृश्‍य पाहायला मिळते.

Web Title: ekiv waterfall tourism