का दिल्या एकनाथ शिंदेंनी झेडपी अध्यक्ष कांबेळेंना शुभेच्छा

Eknath Shinde wishes Solapur ZP President Kamble
Eknath Shinde wishes Solapur ZP President Kamble
Updated on

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेचे केम (ता. करमाळा) गटातील सदस्य अनिरुद्ध कांबळे हे विजयी झाले. ते माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक आहेत. त्यांना गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी माजी आमदार पाटील यांचे समर्थ उपस्थित होते.  

हेही वाचा : म्हणून सुरु आहे तरुणांची भटकंती
कांबळे शिवसेनेचेच

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कांबळे यांच्याबरोबर करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे व उपसभापती दत्ता सरडे यांनी मुंबई येथे मंञालयात गृहमंत्री शिंदे यांची भेट घेतली. तेव्हा शिंदे यांनी त्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले. सोलापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेचे कांबळे हे भाजप व समविचारी आघाडीच्या पाठिंब्यावर अध्यक्ष झाले आहेत. कांबळे हे माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक आहेत. कांबळे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडुन आलेला अध्यक्ष होण्याची ही जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहीलीच वेळ आहे.  तसेच माजी आमदार पाटील यांनी करमाळा पंचायत समितीवरही आपली सत्ता कायम ठेवली आहे. शुक्रवारी शिवसेनेच्या या नुतन पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीची त्यांना वेळ देण्यात आली होती, मात्र मंञीमंडळ खाते वाटपाची बैठक लांबल्याने त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. 

हेही वाचा : मोठी बातमी : सोलापूर झेडपी अध्यक्षपदासाठी मोहिेते पाटलांची ठाकरेंशी झाले होती चर्चा?
कोणकोण होते उपस्थित

यावेळी नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, उपसभापती दत्ता सरडे, पंचायत समिती सदस्य अतुल पाटील, गणेश चौधरी, माजी सभापती शेखर गाडे, केमचे माजी सरपंच अजित तळेकर, जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर, अण्णा शिंगाडे, बाळू पारखे, बाबा बोरकर, राहुल गोडगे, युवा सेनेचे हर्षल वाघमारे, सागर पोरे, विजय साळुंखे, सुनिल ढेरे आदी उपस्थित होते.

सोलापूरच्या विकासासाठी मदत करणार
आम्ही सर्व पदाधिकारी माजी आमदार नारायण पाटील यांना मानणारे आहोत. आम्ही सर्वांनी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. सोलापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आणली म्हणून कैतुकही केले. सोलापूर जिल्हा व करमाळा तालुक्याच्या विकासासाठी मदत करण्याचे त्यांनी यावेळी आश्वासनही दिले. 
- गहिनीनाथ ननवरे, 
सभापती पंचायत समिती, करमाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com