भावानेच केली लहान भावाची हत्या

कुलभूषण विभूते
गुरुवार, 5 जुलै 2018

वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्यातील हत्तीज येथे कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने अविवाहात असलेल्या लहान भावाचा खून केल्याची घटना बुधवारी (ता.3) मध्यरात्रीच्या सुमारास झोपलेल्या ठिकाणी घडली. सुरज सुर्यकांत जाधव (वय 23) असे मयत तरूणाचे नाव आहे. यातील आरोपी मोठा भाऊ सुहास सुर्यकांत जाधव (वय 34) यास वैराग पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीसाकडून दिलेली माहिती अशी की, मयताचे वडिल सुर्यकांत जाधव यांना वीस एकर बागायत शेती असून 17 एकर ऊस आहे. बागायतशेतीसह त्यांना चार ट्रॅक्टर आहेत. त्यांची दोन मुले मयत सुरज व आरोपी सुहास हे दोघे कामकाज पहात होते. सुर्यकांत जाधव यांना पत्नी, दोन मुले व तीन मुली (विवाहीत) एक सुन व नातवंडे असा परिवार असून आरोपी सुहास यास पत्नी एक मुलगा, एक मुलगी आहे. तर मयत सुरज हा अविवाहीत होता. दोघेही एकाच कुटुंबात एकत्र राहत होते. ते दोघेही शेतीसह चार ट्रॅक्ट्ररद्वावरे अवैद्य गौण खनिज वाळू, मुरूम, माती, खडीचा व्यवसाय करीत होते.

जाधव कुटुंबाचे दोन ट्रॅक्टर अवैध वाळूचोरी प्रकरणी वैराग पोलीस स्टेशनला जप्त आहेत. आरोपी सुहास याच्यावर गौण खनिज उत्खनन, व इतर अनेक घटनेत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याने बुधवारी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या सुरजचा लोखंडी हातोड्याने मारून खून केला. हे कृत्य आपण माझा लहान भाऊ मयत सुरज हा वाईट मार्गास लागला होता. आम्ही चांगल्या घरचे आहोत. त्याला सांगूनही तो ऐकत नव्हता. त्यामुळे त्याचा मध्यरात्री झोपलेल्या ठिकाणी लोखंडी हातोड्याने मारून कायमचाच संपविले असल्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले. आरोपी सुहास यास लोखंडी हातोड्याससह ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.

Web Title: elder brother killed younger brother