Sangli Crime : उसाचा पाला पेटवताना वाऱ्याने घेतले रौद्र रूप; शिराळ्यात वृद्धाचा होरपळून मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
Wind Turns Controlled Fire : शिराळा तालुक्यात उसाचा पाला पेटवताना वाऱ्याच्या झोतामुळे आग अनियंत्रित झाली आणि ७० वर्षीय वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिराळा : वाकुर्डे बुद्रुक पैकी मानेवाडी (ता. शिराळा) येथील दोन सख्खे भाऊ उसाच्या फडातील पाला पेटविण्यास गेले असता आग आटोक्यात आणताना आनंदा रामचंद्र मोरे (वय ७०) यांचा भाजून मृत्यू झाला.