Sugarcane Field Fire Tragedy : उसाच्या फडात होरपळून वृद्धाचा मृत्यू, शेतातील गवत पेटविताना घडला प्रकार, पलूस तालुक्यातील घटना

Farmer Burned Sugarcane Field : पलूस तालुक्यात दुर्दैवी घटना; शेतातील गवत जाळताना उसाच्या फडात आग भडकली आणि वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला.
Palus taluka tragedy sugarcane field

Palus taluka tragedy sugarcane field

esakal

Updated on

Elderly Man Dies Farm Fire : शेतजमिनीच्या आजूबाजूचे गवत पेटविताना उसाच्या फडात होरपळून एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. विलास सावळा पवार (वय ८०) असे त्यांचे नाव आहे. याबाबत प्रताप पाटील व दीपक कदम यांनी पलूस पोलिसांत माहिती दिली. पलूस पोलिसांनी प्राथमिक पंचनामा केला. पलूस ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com