बेळगावातील 481 ग्रामपंचायंतींची निवडणूक घोषित  ; आजपासून आचारसंहिता   

Election of 481 Gram Panchayats in Belgaum declared
Election of 481 Gram Panchayats in Belgaum declared
Updated on

बेळगाव - राज्यातील 5,763 ग्रामपंचायतींपैकी जिल्ह्यातील 481 ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित झाली आहे. त्यात पहिल्या फेरीत 261 आणि दुसऱ्या टप्प्यात 220 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यामध्ये बेळगाव तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात 22 डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात 27 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान सकाळी 7 ते सायंकाळी 5 यावेळेत चालणार आहे. 


ग्रामपंचायत अखरित्यातीत आजपासून (ता.30) आचारसंहिता जारी झाली असून, 31 डिसेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत लागू असणार आहे. आचारसंहिता नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद आणि महापालिका कार्यकक्षेत असणार नाही. ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या झेंड्यावर लढविता येणार नाही. परंतु, पक्षांचे पाठबळ घेऊन निवडणूक लढविता येऊ शकते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरण्यासाठी युध्दपातळीवर तयारी करणाऱ्यांनी आता तयारीचा वेग वाढविला आहे. परत मतदारांची मोट बांधणी आणि तयारी सुरु केली आहे. 

बेळगाव तालुक्‍यातील 57, खानापूर, तालुक्‍यातील 51, हुक्केरी 52, बैलहोंगल 33, कित्तूर 16, गोकाक 32 आणि मुडलगी 20 मिळून 261 ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यात मतदान ( होणार आहे. सौदत्ती 41, रामदूर्ग 33, चिक्कोडी 36, निपाणी 27, अथणी 41, कागवाड 9 व रायबाग 33 मिळून 220 ग्रामपंचायतींसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

जिल्हा ः बेळगाव 
तालुके ः 14 
निवडणूक घोषित ग्रामपंचायत ः 481 
मतदान केंद्र ः 3,817 
 
 मतदार 
पुरुष मतदार ः 1,253,283 
महिला मतदार ः 1,253,283 
एकूण मतदार ः 2,553,153 


बेळगाव तालुक्‍यातील घोषित ग्रामपंचायत निवडणूक 
अरळीकट्टी, येळ्ळूर, उचगाव, कडोली, हिरेबागेवाडी, मारीहाळ, सुळगा, अंकलगी, होसवंटमुरी, मुतगा, हंदीगनूर, केदनूर, बंबरगा, किणये, मुचंडी, अष्टे, हिंडलगा, कंग्राळी बी. के., काकती, सांबरा, धामणे एस., होनगा, हुदली, हालगा, बस्तवाड, बाळेकंद्री के. एच., सुळेभावी, तारीहाळ, मास्तमरडी, तुरमुरी, कुद्रेमानी, अगसगा, भेंडिगेरी, तुम्मरगुद्दी, बेक्कीनकेरी, देसूर, बाळेकुंद्री बी. के., के. के. कोप्प, बेनकनहळ्ळी, मंडोळी, बडस के. एच., संतीबस्तवाड, निलजी, नंद्दीहळ्ळी, सुळगा (यू), बेळगुंदी, आंबेवाडी, कंग्राळी के. एच., मुत्नाळ, धरनट्टी, मोदगा, वाघवडे, कलखांब, करडीगुद्दी, कुकडोळी

 
अशी चालणार निवडणूक 
 पहिली फेरी-दुसरी फेरी 
उमेदवारी अर्ज दाखल (अधिसूचना) ः 7 डिसेंबर-11 डिसेंबर 
उमेदवारी अर्ज दाखलसाठी अंतिम तारीख ः 11 डिसेंबर -16 डिसेंबर 
अर्जांची छाननी ः 12 डिसेंबर-17 डिसेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेणे ः 14 डिसेंबर-19 डिसेंबर 
मतदान ः 22 डिसेंबर-27 डिसेंबर 
मतमोजणी ः 30 डिसेंबर 
निवडणूक प्रक्रियेची सांगता ः 31 डिसेंबर 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com