निवडणूक कार्यालये लागली गजबजू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालये गजबजू लागली आहेत. शक्तिप्रदर्शनासाठी गावांमधून रॅली निघू लागल्याने घोषणाबाजीने गावे दणाणू लागली आहेत. दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी 67, तर पंचायत समितीसाठी 77 जणांनी उमेदवारी अर्ज भरले.

आज अर्ज भरलेल्यांमध्ये जिल्हा परिषद मतदारसंघातून विद्यमान सदस्या आकांक्षा पाटील (करंजफेण, ता. शाहूवाडी), अजित नरके (कोतोली, ता. पन्हाळा), सर्जेराव पाटील - पेरीडकर (शित्तूर तर्फ वारुण), माजी अध्यक्ष बाबूराव हजारे (परिते, करवीर), माजी सदस्य अमरसिंह पाटील (सातवे, ता. पन्हाळा), संजय कलिकते व माजी सदस्य राजेंद्र लोखंडे (कौलव), आरती अभिजित तायशेटे (राधानगरी), स्वरूपाराणी सत्यजित जाधव (कडगाव, ता. भुदरगड), वेदांतिका धैर्यशील माने, पद्मावती राजेश पाटील (रुकडी, ता. हातकणंगले), वसंतराव धुरे (उत्तूर, ता. आजरा), कोमल सरदार मिसाळ (वडणगे, ता. करवीर), शीतल पाटील (शिंगणापूर) यांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ तीन दिवस राहिले असल्याने गर्दी होऊ लागली आहे. काही ठिकाणी शक्‍तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले. आज जिल्हा परिषदेसाठी सर्वांत अधिक 15 उमेदवारी अर्ज हातकणंगले तालुक्‍यातून भरले. पाठोपाठ कागल तालुक्‍याचा क्रमांक लागतो. कागलमधून जिल्हा परिषदेसाठी 13 अर्ज दाखल झाले आहेत. गगनबावडा गटातून मात्र आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

जिल्हा परिषदेसाठी तालुकानिहाय उमेदवारी अर्ज दाखल केलेल्याची संख्या. कंसातील आकडे पंचायत समितीसाठीचे. शाहूवाडी 2 (7), पन्हाळा 11 (8), हातकणंगले 15 (12), शिरोळ 3 (2), कागल 13 (10), करवीर 11 (14), राधानगरी 7 (9), भुदरगड 1 (3), आजरा 1 (4), गडहिंग्लज 2 (8), चंदगड 1 (0).

Web Title: Election offices had babel