वीज दराची सवलत वस्त्रोद्योगाला लागू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

इचलकरंजी - राज्यातील सूत गिरण्यांसह वस्त्रोद्योगातील घटकांना शासन निर्णयानुसार वीज दर सवलतीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शासनाकडे नोंदणी करण्यात आलेल्या घटकांना मार्च महिन्यातील वीज बिलामध्ये सवलत लागू केली आहे. यामध्ये सहकारी सूत गिरण्यांना प्रती युनिट तीन रुपये; तर अन्य घटकांना दोन रुपये सवलत दिली आहे. यामुळे प्रलंबित असलेला वीज दर सवलतीचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

वस्त्रोद्योग सध्या विविध कारणांनी अचडणीतून जात आहे. यंत्रमाग उद्योगासह सर्वच सूतगिरण्यांची तर अवस्था वाईट आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी राज्य शासनाने २१ डिसेंबरला वीज दर सवलतीचा अध्यादेश काढला होता. त्यामुळे वस्त्रोद्योगात खुशीचे वातावरण होते. मात्र त्यानंतर वीज बिलांत मात्र प्रत्यक्षात सवलत मिळाली नाही. वीज दरात सवलत न मिळाल्यास अनेक वस्त्रोद्योगातील घटक आर्थिक अडचणीत सापडले होते. याबाबत विविध पातळीवर पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला यश आल आहे. मार्च महिन्यातील वीज बिले वस्त्रोद्योगातील संबंधित घटकांना आली आहेत.

त्यामध्ये वीज दरातील सवलत लागू करण्यात आली आल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सहकारी सूतगिरण्या, खासगी सूत गिरण्या, निटींग, गारमेंट, सायझिंग, प्रोसेसिंग आदी घटकांचा समावेश आहे. काही तांत्रिक कारणास्तव वीज दरातील सवलतीच्या अंमलबजावणीच्या प्रश्‍न प्रलंबीत होता. आता वीज दरात सवलत मिळाल्यामुळे या घटकांना मंदीच्या काळात दिलासा मिळाला आहे.

सूत गिरण्यांना होणार मोठा लाभ
राज्यातील सहकारी सूत गिरण्यांना वीज सवलवतीचा मोठा लाभ मिळणार आहे. २५ हजार चात्या असलेल्या सूत गिरण्यांच्या वीज बिलात दरमहा २२ ते २५ लाख रुपये वाचणार आहेत. 

सवलत अशी मिळणार...
राज्यात ७२ सहकारी सूत गिरण्या सुरू आहेत. त्यांना वीज दरात प्रतियुनिट तीन रुपये सवलत मिळणार आहे. या शिवाय खासगी सूत गिरण्यासह अन्य घटकांना प्रति युनिट २ रुपये वीज सवलत मिळणार आहे.

Web Title: Electricity rate discount applied to the textile industry

टॅग्स