esakal | शॉकने संपवले माऊलीचे जीवन; लेकराचा 'लळा' पाहून गावही हळहळले
sakal

बोलून बातमी शोधा

शॉकने संपवले माऊलीचे जीवन; लेकराचा 'लळा' पाहून गावही हळहळले

काही माकडं आपल्या पिलांना पोटाशी धरून पाण्याच्या टाकीवर तर कधी ग्रामपंचायतच्या इमारतीवर उड्या घेऊ लागली.

शॉकने संपवले माऊलीचे जीवन; लेकराचा 'लळा' पाहून गावही हळहळले

sakal_logo
By
विजय लोहार

नेर्ले : माणसाप्रमाणे प्राणी, पक्षी यांनाही माया, कुटुंब, प्रेम, काळीज असते. एक मादी माकड आणि तिचे पिल्लू या मायलेकरांच्या बाबतीत असाच एक काळीज हेलवणारा प्रसंग नेर्ले येथे घडला. मंगळवार हा नेर्लेचा बाजाराचा दिवस असतो. सायंकाळी वेळी बाजारात लोकांची गर्दी होती. माकडांचा कळप पाण्याच्या टाकीजवळ हजर झाला होता. यावेळी काही माकडांच्या झाडावरून माकड उड्या सुरू झाल्या. एका नर वानराने माकडांच्या मागे धावायला सुरुवात केली. अर्धा तास माकडांचा धिंगाणा सुरू होता. काही माकडं आपल्या पिलांना पोटाशी धरून पाण्याच्या टाकीवर तर कधी ग्रामपंचायतच्या इमारतीवर उड्या घेऊ लागली.

जसे घराघरात वाद होतात तसेच प्राण्यांमध्येही वाद होतात. रागातून नर वानर मादीच्या मागे लागला. तिच्या पोटाला पिल्लू घट्ट पकडून होते. या झाडावरून त्या झाडावर, कधी भेळेच्या तर कधी वडापावच्या गाडीवर उड्या मारत मादी माकडाने जीव वाचवण्यासाठी पिलाला घेऊन धावत सुटली. ग्रामपंचायत समोरील विजेच्या खांबावर पिल्लाला घेऊन ती मादी टोकावर गेली. आपल्या पिल्लासह आपण सुखरूप आहोत असं तिला वाटलं. पण काही क्षणातच तिचा तारेचा शॉक बसला अन् पोटाला धरलेल्या पिलासह ती जमिनीवर कोसळली. काही क्षणातच तीचा मृत्यू झाला.

हेही वाचा: 'तुरुंगवास भोगलेल्या भुजबळांनी जनतेची बाजू धैर्यानं उचलली'

या घटनेनंतर तेथे बघ्यांची गर्दी झाली. आई मरून गेली आहे, याची जाणीव त्या पिल्लाला नव्हती. मात्र खाली कोसळताना पिलाला तिने घट्ट पकडलं होतं. ती पाठीवर पडली. मेलेल्या आईच्या कुशीत, पोट, आणि मानेला घट्ट पकडून वारंवार बिलगत होतं. पिल्लाच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. किलकिल्या नजरेने ते आईकडे पहात होते. आईचा थंडगार पडलेला हात उचलून स्वतःच्या पाठीवर घेत होते. आईने घट्ट पकडावं या आशेने तिच्या पोटजवळ शिरत होते.

या प्रसंगावर अनेकजण हळहळ व्यक्त करत होते. या प्रसंगाने काहींचे डोळेही पाणावले. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी व आधार अनिमल रीस्पेक्ट टीमने त्याला दफन केले. खणलेल्या खड्ड्यापर्यंत पिल्लाने आईला सोडलं न्हवतं. आईपासून पिल्लाला बाजूला कसं करायचं हा अनेकांना प्रश्न होता. कारण मेलेल्या आईच्या कुशीतल्या पिलाला वेगळे करताना त्या पिलाचा चित्कार काळीज चिरत होता. जन्म आणि मृत्यू वाटेवर त्या पिलाला आपली आई गेल्याचं दुःख कदाचित नंतर कळालं असावं.

हेही वाचा: 'मी आलो अन् महापूर यायला लागले, असे समजून घेऊ नका'

loading image
go to top