esakal | 'तुरुंगवास भोगलेल्या भुजबळांनी जनतेची बाजू धैर्यानं उचलली'
sakal

बोलून बातमी शोधा

'तुरुंगवास भोगलेल्या भुजबळांनी जनतेची बाजू धैर्यानं उचलली'

छगन भुजबळ यांच्यावरील आरोप खोटे असून त्यात कोणतेही तथ्य नाही. परंतु भुजबळ यांच्यावर आक्षेप ठेवण्यात आले होते.

'तुरुंगवास भोगलेल्या भुजबळांनी जनतेची बाजू धैर्यानं उचलली'

sakal_logo
By
स्नेहल कदम

सांगली : यापूर्वीही भुजबळांवर अनेक आरोप झाले मात्र मला त्यांचं कौतुक वाटतं, की अनेक प्रसंगात ते खंबीरपणे उभे राहिले. तुरुंगवास भोगल्यानंतरही त्यांनी जनतेची बाजू धैर्याने उचलून धरली आहे. आज न्यायालयाने त्यांना निर्दोष सिद्ध केले, अशी प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेविषयी मला आनंद झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: 'तुमचा भुजबळ करू' म्हणणाऱ्यांना भुजबळांचा टोला, म्हणाले...

ते म्हणाले, भुजबळ यांच्यावरील आरोप खोटे असून त्यात कोणतेही तथ्य नाही. परंतु त्यांच्यावर आक्षेप ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांची ईडीकडून चौकशीही झाली. अनेक केसेस त्यांच्यावर दाखल करण्यात आल्या. मूळ आधार धरून वेगवेगळे आरोप त्यांच्यावर झाले. यादरम्यान त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. परंतु आज त्यांची निर्दोष मुक्तता झाली असल्याने मला आनंद झाला आहे.

हेही वाचा: 'ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा मांडणार'

पुढे ते म्हणाले, न्यायालयाने या प्रकरणातील इतरांनाही निर्दोष जाहीर केले आहे. आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो, की भुजबळ निर्दोशच आहेत, आता ते सिद्धही झाले आहे. काही प्रकरणात महाराष्ट्रातील बरेचजण निर्दोष असूनही त्यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप, सीबीआय चौकशी, ईडी यांमध्ये अडकवण्याचे उद्योग अनेकजण करत आहेत. मात्र भुजबळ यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. महाराष्ट्राने त्यांना साथ दिली असून त्यांच निर्दोषत्व एक ना एक दिवस सिद्ध होईल, असा विश्वास लोकांनाही होता, असेही ते म्हणाले.

loading image
go to top