खंडित वीजपुरवठ्याने रात्र जागण्याची वेळ

Light
Light

म्हसवड - येथील वीज वितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने गेल्या आठवड्यात नागरिकांना रात्री जागून काढाव्या लागल्या. 

म्हसवड भागात यंदा पावसाने चांगलीच दडी मारली आहे. सध्या नियमित रखरखते ऊन व ढगाळ हवामानामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. सूर्यदेव आग ओकत असताना या उन्हाच्या तडाख्यापासून सरंक्षण करण्यासाठी नागरिक घरात पंख्याचा आधार घेत आहेत. परंतु, खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना असह्य उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कोणताही तांत्रिक बिघाड नसताना, कसलेही भारनियमन सुरू नसताना दिवसातून २० ते २५ वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याचे नागरिक त्रस्त झाले आहेत. माण तालुक्‍यातील इतर गावांत पावसाळी वातावरण तयार झाले तरीही म्हसवड शहर व परिसरातील वीजपुरवठा खंडित होतो. याबाबतही नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

असह्य उकाडा व डासांचा उपद्रव या समस्येने संपूर्ण रात्रच अंधारात जागून काढावी लागल्याने नागरिक वीज वितरण कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त करीत आहेत. अजूनही दिवसभर वारंवार वीजपुरवठा खंडितच होत आहे. त्यामुळे नागरिक महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. या संदर्भात वीज वितरण विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

ट्रान्स्फॉर्मरच्या बिघाडामुळे अडचण
म्हसवडमधील बाजार पटांगणातील ट्रान्स्फॉर्मरचा वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळेही सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. हा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती होणे आवश्‍यक आहे. ‘महावितरण’ने हा तांत्रिक दोष तातडीने दूर करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com