सातारकरांच्या दातांच्या काळजीसाठी आता सिव्हीलमध्ये आधूनिक डेंटल चेअर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

आधूनिक यंत्रणा उपलब्ध नव्हती. यामुळे दंतशल्य चिकित्सकांना अडचणींना सामाेरे  जावे लागत हाेते. आता रुग्णांना अधिक चांगली सेवा देता येणे शक्य हाेणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी नमूद केले.

सातारा : जिल्हा रुग्णालयातील दंतचिकित्सा विभागात अद्ययावत डेंटल चेअर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दंत रुग्णांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.

अवश्य वाचा -  ती आता ऐकतेय सुमधूरही स्वर 
 
जिल्हा रुग्णालयातील दंत विभागामध्ये पूर्वीच्या चेअरमध्ये बऱ्याच आधुनिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात दंतशल्य चिकित्सकांना अडचणी येत होत्या. सहाजिकच त्यांचा रुग्णांवरही परिणाम होत होता. त्यामुळे दंत विभागाला आधुनिक सुविधांनीयुक्त चेअर मिळावी यासाठी दंत विभाग व जिल्हा शल्य चिकित्सकांकडून शासन पातळीवर प्रयत्न सुरू होते. सततच्या पाठपुराव्यामुळे नुकतीच इलेक्‍ट्रॉनिक ऑपरेटेड डेंटल चेअर उपलब्ध झाली आहे.

हे वाचाच - तिच्यासाठी त्यांनी जमवले लाखांकडून एक..एक..

या चेअरसोबत सेन्सरयुक्त लाइट, हायस्पिड सेक्‍शन, ऍपेक्‍स लोकेटर, ऍटोमॅटिक वॉटर इनलेट, आउटलेट अशा सुविधा आहेत. त्याचबरोबर इलेक्‍ट्रॉनिक ऑपरेटेड अप-डाउन तसेच बॅक-फ्रंट सुविधा आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार देणे सुलभ झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते या चेअरचे उद्‌घाटन झाले.

जरुर वाचा - #MondayMotivation एकीचे बळ
 
या वेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मौखिक आरोग्य) डॉ. विजया जगताप, दंतशल्यचिकित्सक डॉ. कोमल निंबाळकर, डॉ. संजीवनी शिंदे, शाम यादव, इला ओतारी, पराग वासनिक, सूरज कवारे, अर्चना चव्हाण उपस्थित होते. नागरिकांनी नवीन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गडीकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electronic Operated Dental Chair Installed In Satara Civil Hospital