हत्ती तलावाच्या स्वच्छतेला आला वेग; जयहिंद फूड बँकेचे कार्य

राजशेखर चौधरी
सोमवार, 16 जुलै 2018

अक्कलकोट - अक्कलकोट शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि शेख नुरुद्दीन बाबा दर्गाह यांच्या शेजारी असलेल्या ऐतिहासिक संस्थांनकालीन हत्ती तलावाच्या स्वच्छतेच्या मोहिमेने आता वेग घेतला आहे. जयहिंद फूड बँक अक्कलकोटच्या सदस्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. आज रविवारी दिवसभर नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांनी स्वतःची जेसीबी आज या तलावातील माती काढण्यासाठी दिली आहे. यामुळे तलावातील साचलेले गाळ काढण्यास मदत झाली. सकाळी स्थानिक रहिवाशी यांच्या मदतीने तलावात साठलेला कचरा नगरपरिषद कर्मचारी यांच्या सहकार्याने  मोठया प्रमाणात बाहेर काढण्यात आले आहे. या तलावाच्या तिन्ही बाजूस सुंदर दगडी बांधकाम आहे.

अक्कलकोट - अक्कलकोट शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि शेख नुरुद्दीन बाबा दर्गाह यांच्या शेजारी असलेल्या ऐतिहासिक संस्थांनकालीन हत्ती तलावाच्या स्वच्छतेच्या मोहिमेने आता वेग घेतला आहे. जयहिंद फूड बँक अक्कलकोटच्या सदस्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. आज रविवारी दिवसभर नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांनी स्वतःची जेसीबी आज या तलावातील माती काढण्यासाठी दिली आहे. यामुळे तलावातील साचलेले गाळ काढण्यास मदत झाली. सकाळी स्थानिक रहिवाशी यांच्या मदतीने तलावात साठलेला कचरा नगरपरिषद कर्मचारी यांच्या सहकार्याने  मोठया प्रमाणात बाहेर काढण्यात आले आहे. या तलावाच्या तिन्ही बाजूस सुंदर दगडी बांधकाम आहे. पण हा इतके दिवस दुर्लक्षित राहिल्याने सर्व भिंतीती झुडपे वाढली होती ती सर्व काढण्यात आली आहेत. तलावाच्या पश्चिम बाजूस तलावाच्या बाजूस आलेली बाभळीचे झाडे आणि झुडुपे काढण्यात येत आहे. या ठिकाणी आणखी मोठ्या प्रमाणात झुडुपे काढणे बाकी आहे. आता या सर्व झालेल्या कामांमुळे तलावाच्या सौंदर्यात भर पडत आहे. या कामास नगराध्यक्ष व पदाधिकारी आणि या प्रभागाचे नगरसेवक यांनी आणखी लक्ष घालून निधी उपलब्ध करून दिल्यास आणि शहरातील स्वयंसेवी संस्थांनी भरीव मदत केल्यास हे तलाव एक चांगले प्रेक्षणीय स्थळ म्हणून निश्चित नावारूपास येणार आहे.

या तलावाची आणखी अपेक्षित कामे तलावाच्या तिन्ही बाजूस पडझड झालेल्या भिंतीची दुरुस्ती करणे आणि त्याची उंची वाढविणे, संरक्षक दगडी भिंतीस रंगरंगोटी करणे, तलावात मध्यभागी रंगीत कारंज्याची निर्मिती करणे, स्वामी भक्तांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देणे, या तलावाच्या परिसरात पेव्हर ब्लॉक, एल ई डी दिवे आणि बसण्यास बाकडे बसविणे तसेच तलावाच्या दक्षिण बाजूस रस्त्याच्या कडेला संरक्षक कठडे उभे करणे आदी कामे जर पूर्ण झाली तर निश्चितच शहरात एक चांगली गोष्ट पूर्णत्वास जाईल यात शंका नाही.

Web Title: Elephant gets cleanliness of pond; Jaihind Food Bank Work