चंदगडला हत्तीचे आगमन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

चंदगड - तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात कानूर खुर्द (ता. चंदगड) परिसरात हत्तीचे आगमन झाले आहे. काबाडकष्ट करून उभारलेल्या ऊस, केळी, भाजीपाला पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे.  

चंदगड - आंबोली सीमेवरील फाटकवाडी प्रकल्पाजवळून हत्तीचे या भागात आगमन झाल्याचे काही शेतकऱ्यांनी बघितले आहे. बुधवारी (ता.१०) रात्री हत्तीने कानूर खुर्द येथील गुंडू कबाडी, पांडुरंग वनारी, सीताराम कबाडी, प्रकाश सुतार, जानबा गावडे यांच्या शेतातील ऊस पिकाचे नुकसान केले. वनारी यांच्या शेतातील केळीचेही नुकसान केले.

...तर गव्यांकडून पीक फस्त
हत्तीच्या भीतीमुळे शेतातील रखवाली बंद केल्यास गव्यांकडून पीक फस्त होते, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडले आहेत. वन विभागाने याबाबत कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा शेती कसणे अवघड होणार आहे. या हत्तीला कर्नाटक हद्दीत पिटाळून लावावे आणि ते या भागात येऊ नयेत यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

Web Title: Elephant seen in Chandgad taluka