अकरावी ऑनलाईनचे गुऱ्हाळ सुरूच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

सांगली - प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेनुसार व पारदर्शी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने होणे आवश्‍यक आहे. राज्यात अनेक ठिकाणी अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील अधिकारी आणि माध्यमिक विभागाची मानसिकतेअभावी ही प्रक्रिया राबवली जात नाही. 

सांगली - प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेनुसार व पारदर्शी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने होणे आवश्‍यक आहे. राज्यात अनेक ठिकाणी अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील अधिकारी आणि माध्यमिक विभागाची मानसिकतेअभावी ही प्रक्रिया राबवली जात नाही. 

सध्या अकरावी प्रवेशासाठी पालक, विद्यार्थ्यांनी प्रत्येक महाविद्यालयात जाऊन माहिती पुस्तिका खरेदी करावी लागते. प्रत्येक महाविद्यालयाचे ५० रुपये शुल्क आकारणी होते. किमान एक विद्यार्थी चार ते पाच महाविद्यालयांकडे अर्ज दाखल करतो. त्यासाठी पालक-विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागतात. शिवाय गुणवत्ता यादी पाहण्यासाठीही चकरा ठरलेल्या असतात. ११ वी प्रवेशासाठी मंगळवारी (ता. ३) दुपारी तीन नंतर गुणवत्तेनुसार प्रवेश याद्या प्रसिद्ध झाली. बुधवारपासून (ता. ४) तीन दिवस प्रवेश घेण्याची मुदत आहे. 

विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार पसंतीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणे आवश्‍यक असून त्यासाठी प्रवेश प्रक्रिया पारदर्शी होणे महत्त्वाचे आहे. राज्यात अनेक  जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यशस्वीपणे राबविली जात असताना सांगली जिल्ह्यातही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी शिक्षण संचालक व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करावा लागणार आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे पालक व विद्यार्थी या दोघांवरही ताण कमी होण्यास मदत होईल.

प्रवेशासाठी देणगी शुल्क आकारल्याच्या तक्रारी आल्यास त्यासंबंधित कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाई केली जाईल. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. याबाबत माध्यमिक विभागाकडून अहवालही घेणार आहे.
- विजय काळम-पाटील, जिल्हाधिकारी.

Web Title: eleventh online admission issue