बॅंकांच्या एकत्रिकरणाला कर्मचाऱ्यांचा विरोध; 22 ऑक्‍टोबरला संप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - सामाजिक, आर्थिक आणि उद्योगक्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या बॅंकांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाला बॅंक कर्मचाऱ्यांचा विरोध असून, हा निर्णय ग्राहक आणि बॅंकिंग क्षेत्रासाठी हानिकारक आहे. त्यामुळे एकत्रिकरणाच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉई फेडरेशन 22 ऑक्‍टोबरला एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार

कोल्हापूर - सामाजिक, आर्थिक आणि उद्योगक्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या बॅंकांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाला बॅंक कर्मचाऱ्यांचा विरोध असून, हा निर्णय ग्राहक आणि बॅंकिंग क्षेत्रासाठी हानिकारक आहे. त्यामुळे एकत्रिकरणाच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉई फेडरेशन 22 ऑक्‍टोबरला एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार असून, यामध्ये देशभरातील बॅंक कर्मचारी सहभागी होतील, अशी माहिती जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

तुळजापूरकर म्हणाले, ""सरकारच्या या निर्णयामुळे आंध्र बॅंक, कॉर्पोरेशन बॅंक, इंडियन बॅंक, ओरिएन्टल बॅंक यांच्यासारख्या 9 दशकांचा इतिहास असणाऱ्या बॅंका अस्तित्व गमावून बसणार आहेत. बॅंकांच्या एकत्रिकरणाची मागणी संचालक मंडळ किंवा ग्राहकांची नाही. त्यामुळे हे एकत्रिकरण करणे चुकीचे आहे. सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे बॅंकांचा एनपीए वाढला आहे. सर्वसामान्य माणसांच्या कर रूपाने येणारा पैसा सरकार कर्जबुडव्या उद्योजकांवर खर्च करत आहे. त्यामुळे 22 ऑक्‍टोबर रोजी देशभर फेडरेशनतर्फे संप करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employees oppose consolidation of banks; strike on October 22