क्रीडा संकुलात "ये रे माझ्या मागल्या'

क्रीडा संकुलात "ये रे माझ्या मागल्या'

सातारा : नागरिक व खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीने महिन्यापूर्वी व्यापारी संकुलात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या मोहिमेवेळीस खुल्या जागेत असलेल्या बंद चारचाकी आणि खासगी प्रवासी बस काढून घ्याव्यात या सूचनांकडे दुर्लक्ष झाले असून, काही व्यावसायिकांनी पुन्हा अनधिकृतरीत्या जाहिरात फलक लावल्याने "ये रे माझ्या मागल्या' अशी स्थिती निर्माण झाली आहे.
 
शिवसेनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आवारातील व्यापारी गाळेधारकांनी केलेल्या अतिक्रमणाविषयी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन दिले होते. त्यानंतर जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सचिव युवराज नाईक यांनी फौजफाट्यासह आधुनिक यंत्रणेसह अतिक्रमण मोहीम राबवली. या मोहिमेस प्रारंभी विरोध झाला; परंतु नंतर गाळेधारकांनी प्रशासनास सहकार्य केले. येथील खुल्या जागेत बंद अवस्थेत असलेली चारचाकी, तसेच प्रवासी बस काढाव्यात, अशा सूचना श्री. नाईक यांनी केल्या होत्या. त्या वेळी संबंधितांनी लवकरच वाहने हटवितो, असे मान्य केले होते.

महिना उलटला तरी अद्याप वाहने "जैसे थे' परिस्थितीत तेथेच उभे आहेत. अखेर जिल्हा संकुल समितीने दोन वेळा लेखी स्वरूपात नोटीस बजावून वाहन हटविण्याबाबत स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, आगामी काळात वाहने हटवली गेले नाहीत, तर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने कार्यवाही करण्याचे नियोजन क्रीडा संकुल समितीने केले आहे. याबरोबरच या परिसरात काही व्यावसायिकांनी पुन्हा त्यांच्या दुकानाचे जाहिरात फलक विनापरवाना उभारले आहेत. 

वाहनांतून अवैध व्यवसाय 

बंद स्थितीत असलेल्या वाहनांतून अवैध व्यवसाय चालतात अशी चर्चा आहे. यामुळे सायंकाळनतर येथील व्यापारी संकुलात येणाऱ्या ग्राहकांना विशेषतः महिलांना त्याचा त्रास होतो. याबाबत शाहूपुरी पोलिसांत तोंडी तक्रारी दाखल होतात. पीसीआर वाहन गेल्यानंतर तेवढ्यापुरता प्रश्‍न संपतो, तरी कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com