'साताऱ्यातील अतिक्रमणे सोमवारपासून काढा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

सातारा - पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्यांवरून वाहतूक वळविण्यात आली आहे. असे असतानाही शहरातील अतिक्रमणे का काढली नाहीत. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांशी समन्वय साधून कसल्याही परिस्थितीत ही अतिक्रमणे काढा, अशा शब्दांत पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दूरध्वनीवरून मुख्याधिकारी शंकर गोरे यांना फटकारले. यावर श्री. गोरे यांनी सोमवारपासून (ता. 16) अतिक्रमणे काढणार असल्याची ग्वाही दिली. 

साताऱ्याचे "हृदय' असलेल्या पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे राजपथ, कर्मवीरपथ, पोवई नाका ते बस स्थानक, कऱ्हाड, कोरेगाव बाजूकडील रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविली आहे. मात्र, या रस्त्यांवर हातगाडेधारक, खोकीधारक, टपरीवाल्यांची अतिक्रमणे जास्त असून, त्यात बंद व अस्ताव्यस्त वाहने उभी असल्याने अधिक अडथळे होत आहेत. त्याबाबतचे वास्तव "सकाळ'ने शुक्रवारच्या अंकात मांडले. दरम्यान, श्री. शिवतारे येथील शासकीय विश्रामगृहावर आले असता त्यांनी बातमीची दखल घेऊन मुख्याधिकारी गोरे यांना फोन लावला. 

पोवई नाका भोवतालच्या पर्यायी रस्त्यांवरील अतिक्रमणे तत्काळ निघाली पाहिजेत. सातारकर, प्रवाशांचे हाल होणे योग्य नाही. अतिक्रमणे काढल्यानंतर जे कोणी पुन्हा अतिक्रमण करत असतील त्यांना दंड करा. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांशी चर्चा करून ती तत्काळ काढा आणि अतिक्रमण काढल्याचा अहवाल पाठवा, असे आदेश श्री. शिवतारे यांनी दिले. त्यावर श्री. गोरे यांनी पोलिस विभागांशी चर्चा झाली असून, अधिसूचनेत सुचविलेल्या पर्यायी रस्त्यांवरील सोमवारपासून अतिक्रमण काढणार असल्याचे सांगितले. 

Web Title: encroachment Remove from Monday