इंजिनिअरिंग द्वितीय वर्ष प्रवेश वेळापत्रक जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

सातारा - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बारावी आणि आयटीआय (दहावीनंतर) अभ्यासक्रमानंतर इंजिनिअरिंग पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठीचे वेळापत्रक http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 12 जुलैपर्यंत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावेत तसेच प्रवेशांची निश्‍चिती ही जवळच्या एआरसी सेंटरवर करावी, असे आवाहन सीईटी सेलद्वारे करण्यात आले आहे. 

राज्यातील इंजिनिअरिंग डिप्लोमा कॉलेजांमध्ये थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेद्वारे पदवीधर विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत. संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 300 रुपये; तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 400 रुपये शुल्क आहे. विद्यार्थी नेट बॅंकिंगद्वारे तसेच डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे शुल्क भरू शकतात. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती, अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची पात्रता, नियमावली www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी वेळापत्रक 
ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची पडताळणी व कन्फर्मेशन -12 जुलै 
जात वैधता प्रमाणपत्र, जमाती पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे स्वीकारणे-12 जुलै 
प्राथमिक गुणवत्ता यादी - 13 जुलै 
गुणवत्ता यादीवर आक्षेप -14 ते 16 जुलै 
जात वैधता प्रमाणपत्र, जमाती पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे स्वीकारण्याची अंतिम तारीख -16 जुलै 
अंतिम गुणवत्ता यादी - 17 जुलै 
रिक्त जागा जाहीर करणे - 17 जुलै 
कॉलेजांचे प्राधान्यक्रम भरणे - 18 ते 21 जुलै 
प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर - 22 जुलै 
एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्‍चित करणे - 23 ते 26 जुलै 
दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर - 27 जुलै 
कॉलेजांचे प्राधान्यक्रम भरणे - 28 ते 31 जुलै 
प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर - एक ऑगस्ट 
एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्‍चित करणे - दोन ऑगस्ट ते चार ऑगस्ट 
तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर - पाच ऑगस्ट 
कॉलेजांचे प्राधान्यक्रम भरणे - सहा ते नऊ ऑगस्ट 
प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर - 10 ऑगस्ट 
एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्‍चित करणे - 11 ते 14 ऑगस्ट 
अतिरिक्त प्रवेश फेरीसाठी कॉलेजांमधील रिक्त जागा जाहीर करणे - 18 ऑगस्ट 
कॉलेजांसाठी प्राधान्य अर्ज भरणे - 19 ते 20 ऑगस्ट 
प्रवेशाची गुणवत्ता जाहीर होणे - 21 ऑगस्ट 
कॉलेजांमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश करणे - 22 ते 23 ऑगस्ट 
प्रवेशाचा कट ऑफ दिनांक - 28 ऑगस्ट 
कॉलेजांना डेटा अपलोड करणे - 30 ऑगस्ट 

Web Title: Engineering second year timetable announced

टॅग्स