कोयनेत साठा पुरेसा; फक्त योग्य नियोजन हवे' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koyna Dam
कोयनेत साठा पुरेसा; फक्त योग्य नियोजन हवे' | Sangli

कोयनेत साठा पुरेसा; फक्त योग्य नियोजन हवे'

सांगली : प्रत्येक वर्षीच उन्हाळ्यात जिल्ह्याच्या पूर्व भागात भूजलपातळीत घट होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. यंदाचे वर्षही त्याला अपवाद ठरणार नाही. फेब्रुवारी ते एप्रिल मधील टंचाईचा विचार करून आताच नियोजन करावे लागणार आहे. म्हैसाळ, टेंभू, आरफळ योजना सुरू करण्याचे नियोजन पाटबंधारेकडून(irrigation department) व्हायला हवे. शेतकऱ्यांनीही वेळेवर मागणी करायला हवी.

कोयना धरणात (koyna dam)सध्या ८९.३९ (tmc) अशा पुरेसा पाणीसाठ्यामुळे यंदा शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी अडचणीची शक्यता नाही. गेल्यावर्षी फेब्रुवारीत पाणीटंचाई, नंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. यंदा पाटबंधारेकडून याच महिन्यात तातडीने पावले उचलली तर सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी धावाधावच करावी लागणार नाही. त्यादृष्टीने नियोजन हवे. कोयना धरण पूर्वेकडील विभागात सिंचनासाठी पाण्याची मागणी झाल्याने कोयना धरण पायथा वीज गृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती (eletricity)करून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद १०५० क्युसेक सोमवारपासून (ता. ३) पाणी सोडण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यासाठी हे पाणी सोडले आहे. याच पार्श्‍वभूमीवर सांगली जिल्ह्याची मागणी नोंदवताच पाणी मिळणार आहे. शेती तसेच पिण्याच्या पाण्यासाठी धरणात पुरेसा साठा आहे.

हेही वाचा: सातारा : वृद्धाचे एटीएम कार्ड चोरून पैसे काढल्याप्रकरणी एकास अटक

गेल्या वर्षी फेब्रुवारीत मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्‍याच्या दुष्काळी भागासाठी तातडीने म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणीने जोर धरला होता. त्यासाठी शेतकरी व राजकीय पक्षांनी मंत्री, पाटबंधारे, जिल्हाधिकारी यांना मागण्यांची निवेदने दिल्यानंतर महिनाभरांनी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याची तयारी केली. मात्र शेतकऱ्यांतून मागणी नसल्याने पंधरा दिवसांनी प्रत्यक्ष पाणी सोडण्यासाठी वेळ गेला.

गतवर्षी ५० लाखांवर पाणीपट्टी जमा...

विशेष म्हणजे सन २०२१ मध्ये शेतकऱ्यांनी ५० लाखांहून अधिक रोख रकमेत पाणीपट्टी भरली. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात पाटबंधारे अधिकाऱ्यांना यश आले. जलसंपदाच्या नियमानुसार ८१:१९ प्रमाणात पाण्याचे पैसे भरावे लागतात. ते आयत्यावेळी भरण्यापेक्षा महिनाभर तयारी केली तर प्रक्रिया सुलभपणे राबवणे शक्य आहे.

हेही वाचा: Covid Returns! लहान मुले, को-मॉर्बिड, गर्भवतींची घ्या 'अशी' काळजी

तलाव भरण्याची गरज...

दुष्काळी भागात एप्रिल-मे महिन्यात जिल्ह्यच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई नेहमीच भासते. त्यासाठी टॅंकर सुरू करण्यापेक्षा सिंचन योजना सुरू केल्यामुळे टॅंकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही. पूर्व भागातील ग्रामपंचायतींनीही तलाव भरण्यासाठीची रक्कम भरली. यंदाही अशी रक्कम भरल्यास टॅंकर सुरू करण्याची वेळच येणार नाही. मार्च २०२१ मध्ये सिंचन योजनेतून गत वर्षी सुमारे तीन टी.एम.सी पाणी उचलले होते. त्यातून दुष्काळी भागातील तलाव भरून घेतल्यामुळे दुष्काळी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. गेल्या वर्षीही प्रशासनाने जिल्ह्यात किमान दहा टॅंकर लागतील, अशी अटकळ बांधून जाहिरातही प्रसिद्ध केली होती.

हेही वाचा: बेळगाव : जिल्ह्यातील तलाव विकासासाठी मिळेना निधी

कोयना दृष्टिक्षेप

  1. एकूण क्षमता - १०५ टीएमसी

  2. सध्याचा साठा - ८९.३९ टीएमसी

  3. सोमवारपासून सोडलेले पाणी - १०५० क्युसेक

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top