बेळगाव : जिल्ह्यातील तलाव विकासासाठी मिळेना निधी

शासनदरबारी प्रस्ताव प्रलंबित; तलाव संजीवनी योजना राबविण्यात अडसर
belgaum lake
belgaum lakesakal
Summary

शासनदरबारी प्रस्ताव प्रलंबित; तलाव संजीवनी योजना राबविण्यात अडसर

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील (belgaum district)ग्रामीण जनतेला आणि जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने तलाव विकास करण्याची ‘तलाव संजीवनी’ योजना राबविण्यात आली आहे. मात्र, लघु पाटबंधारे खात्याच्या (irrigation department)कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील १७ तलावांचा विकास करण्यासाठी १४.४५ कोटी खर्चाचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

belgaum lake
KDCC Election: आम्हीच प्रचंड मतांनी विजयी होऊ ; मुश्रीफांचा विश्वास

तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासह अंतर्जल वाढविणे आणि दुष्काळी परिस्थितीत पाणी समस्या दूर करण्याच्या उद्देशाने लघु पाटबंधारे खात्याकडून आपल्या कार्यक्षेत्रातील १९० तलावांचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, सरकारकडून मंजुरी मिळत नसल्याने या योजनांची अमंलबजावणी ठप्प झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून ‘तलाव संजीवनी’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रमुख तलावांतील गाळ काढण्याचे काम झाले आहे. यासह रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील १२० हून अधिक तलावांचा विकास करण्यात आला आहे. मात्र, लघु पाटबंधारे खात्याच्या कार्यक्षेत्रातील मोठे, लहान आणि मध्यम आकाराच्या तलावातील गाळ काढण्यासाठी पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. यातील ७० टक्के तलावात पाणी असल्याने सद्यस्थितीत तलावातील गाळ काढणे शक्य नसल्याचे पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे.

belgaum lake
सोलापूर-विजयपूर महामार्गावर भीषण अपघात! चार तरुण ठार, एक गंभीर

२०१८ ते २०२० या कालावधीत अंतर्जल स्तर वाढविण्यासह तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी या योजनेंतर्गत तलावांतील गाळ काढण्याकरीता लघुपाटबंधारे आणि पंचायतराज खात्यांकडून सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, निधीची कमतरता, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि तलावात पाणी भरल्याने गाळ काढण्याचे काम थांबविण्यात आले. तर २०२१ मध्ये या योजनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे तलावांचा विकास रखडला आहे.

belgaum lake
Sindhutai Sapkal: अनाथांची माय आणि कोल्हापूरची घट्ट नाळ..!

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सरकारने तलावांच्या विकासकामांसाठी अनुमोदन दिलेले नाही. यावर्षी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी मंजूर करण्याची शक्यता आहे. आवश्यक प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

- के. सी. सतीश, मुख्य अभियंता, लघू पाटबंधारे खाते, बेळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com