वीज दरवाढीविरोधात कोल्हापूर येथे उद्योजकांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

कोल्हापूर - सतत होणारी अन्यायी वीज दरवाढ रद्द करावी, या मागणीसाठी उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांतर्फे आज (ता. २१) धडक मोर्चा काढण्यात आला. सासने मैदान येथून सकाळी दहाला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला त्यानंतर महावितरण कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. यामध्ये उद्योजक, व्यापारी, कामगार सहभागी झाले आहेत. 

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्‍चरर्स (स्मॅक), गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्‍चरर्स, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, फौंड्री उद्योजक, तसेच इचलकरंजी उद्योजक असोसिएशन यांच्यासह स्टोन - टाईल्स असोसिएशन, चर्मकार व्यावसायिक, हॉटेल मालक संघ, पेट्रोल पंपमालक असोसिएशन, टिंबर असोसिएशन, थिएटर मालक असोसिएशन, किराणा माल व्यावसायिक, हार्डवेअर असोसिएशन आदी १६ संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आहेत.

महावितरणने सप्टेंबरपासून वीज दरवाढ केली आहे. सुरवातीला सहा टक्के दरवाढ होणार होती; प्रत्यक्षात २० ते २५ टक्के दरवाढ केल्याने उद्योजकांची वीज बिले हजारो रुपयांनी वाढली. तीच अवस्था व्यावसायिकांची आहे. येत्या एप्रिलमध्ये आणखी दरवाढ होणार असल्याचे समजते. राज्यात वीज दर प्रति युनिट साडेनऊ रुपये आहे. तोच कर्नाटकात आठ रुपये ५४ पैसे, तर गुजरातमध्ये आणखी कमी आहे. त्यामुळे राज्यातील अन्यायी वीज दरवाढ रद्द करावी, अशी मागणी या सर्वांची आहे.

Web Title: Entrepreneurs move against power hike