नवउद्योजकांना व्यवसायात झेप घ्यावयाची असेल तर त्यांचे पंख बळकट करायला हवेत | Milind Kamble | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवउद्योजकांना व्यवसायात झेप घ्यावयाची असेल तर त्यांचे पंख बळकट करायला हवेत

नवउद्योजकांना व्यवसायात झेप घ्यावयाची असेल तर त्यांचे पंख बळकट करायला हवेत

कागल - राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजातील युवकांना उद्योजक बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले. नवउद्योजकांना व्यवसायात झेप घ्यावयाची असेल तर त्यांचे पंख बळकट करायला हवेत. छ. शाहू महाराजांचा हाच वारसा पुढे चालवित डिक्की पुणे व शाहू ग्रुप दलित समाजातील युवकांचे व्यवसायाचे पंख बळकट करणार आहे. असे प्रतिपादन डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांनी केले.

बामणी ता. कागल येथील आर. के. मंगल कार्यालय येथील सभागृहात शाहू ग्रुप, डिक्की व सीड्बी यांच्या संयुक्त विद्यमाने स्टॅंडअप् कोल्हापूर अंतर्गत स्वावलंबन संकल्प मेळावा संप्पन्न झाला. कागल, गडहिंग्लज, आजरा उत्तूरसह जिल्ह्यातील बाराशेहे हून अधिक तरुण या मेळाव्यास उपस्थित होते.

डॉ. कांबळे पुढे म्हणाले, दलित समाजातील तरुणांनी दिशाभूल करणाऱ्या गोष्टींमध्ये अडकू नये. शाहू, फुले, आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांनी जो स्वावलंबनाचा मंत्र दिला.त्यावरच डिक्की व शाहू ग्रुप काम करणार असून याचा लाभ घेऊन येत्या शाहू जयंती पर्यंत १०० गंगाराम कांबळे घडविण्याचे राजे समरजितसिंह घाटगे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहूया. हेच स्टॅंडअप कोल्हापूरचे यश असेल. असेही ते म्हणाले.

हेही वाचा: सांगली : समडोळीत गव्याचे दर्शन; परिसरात सतर्कतेचा इशारा

शाहू ग्रूपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, दलित समाजातील युवकांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे. यासाठी त्यांना यशस्वी उद्योजक बनविणे. त्याबरोबरच त्यासाठी त्यांना कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या दारात जावे लागू नये. इतके सक्षम बनवणे हे माझे स्वप्न आहे. यासाठी शाहू ग्रुप, राजे बँक, डिक्की व सिड्बी या माध्यमातून पाठबळ देणार आहे. दलित समाजातील युवकांना त्यांच्या पायावर उभे करणे हा माझा राजधर्म आहे. आता दलित समाजाने इतिहासातील गोष्टींमध्ये फार गुंतू नये. असेही ते म्हणाले.

यावेळी रविकुमार नारा, बी व्ही आर प्रसाद ,संतोष कांबळे, संजीव डांगी, राजा नायक,सीमाताई कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत रमेश कांबळे यांनी केले.लखन हेगडे यांनी आभार मानले.

कोल्हापुरात डिक्कीचे कार्यालय सुरू करणार - डॉ. कांबळे

छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध अतूट होते. मात्र शाहूंच्या जन्मभूमी मध्येच डिक्कीचे कार्यालय नाही. ते सुरू करावे. असे आवाहन श्री घाटगे यांनी केले.हाच धागा पकडत डॉ. कांबळे यांनी आपल्या मनोगतामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजाची जन्मभूमी कोल्हापूरमध्ये डीक्की चे कार्यालय लवकरच सुरू करणार आहोत अशी घोषणा यावेळी केली. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्तपणे दाद दिली.

loading image
go to top