सांगलीत म्युकर मायकोसिसची एंट्री; तज्ज्ञांनी दिला सल्ला

सांगलीत म्युकर मायकोसिसची एंट्री; तज्ज्ञांनी दिला सल्ला

सांगली : जिल्ह्यात म्युकर मायकोसिस (Sangli Mucormycosis)या बुरशीजन्य रोगाचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या आठवडाभरात शहरातील नाक, कान डोळा आणि घसा तज्ज्ञांकडे असे अनेक रुग्ण दाखल झाले आहेत. त्यातल्या बहुतेक रुग्णांचा कोविडचा (Covid 19) पुर्वेइतिहास आहे. हा बुरशीजन्य आजाराचे रुग्ण कोरोनापूर्वी तीन-चार वर्षांतून एखादाच दिसे. आता मात्र असे बरेच रुग्ण आढळत असल्याचे तज्ज्ञांचे निरिक्षण आहे. सांगलीत गेल्या आठवडाभरात विविध तज्ज्ञांकडे असे तीसहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

Entry of Sangli mucormycosis update marathi news

नेत्रतज्ज्ञ सौरभ पटवर्धन म्हणाले,‘‘ उपचारास दिरंगाई करु नका. यावर उपचार आहेत. आजाराची तीव्रता खूप वाढू शकते. वेळेत न आल्यास म्युकर बुरशीनं सायनस, डोळा आणि मेंदू यापैकी कुठल्या तरी भागात प्रवेश मिळवलेला असतो. या बुरशीनं मेंदूवर हल्ला केला असल्यास, अशा रुग्णाला वाचवणं कठीण होतं. काही वेळा औषधानं बुरशीचा संसर्ग आटोक्यात येण्यासारखा नसला डोळ्याची दृष्टी जाऊ शकते.

नाक,घसा,कान तज्ज्ञ अशोक पुरोहित म्हणाले,‘‘ ही बुरशी प्रथम नाकावाटे जाते आणि तिथून सायनसमध्ये वाढते. तिथून ती डोळ्यात आणि मेंदूत शिरते. या बुरशीचा संसर्ग झपाट्याने होत असतो. काही दिवसातच अनेक अवयवांवर ही बुरशी हल्ला करते. रुग्णाच्या कपाळाखाली किंवा तोंडात टाळ्याच्या जागी काळे व्रण दिसणं, हे या आजाराचं गंभीर लक्षण मानलं जातं. 'म्युकर' बुरशीचा संसर्ग शरीराच्या ज्या भागात होतो, त्या भागातल्या केशनलिका ही बुरशी निकामी करते. म्हणजेच, केशनलिका बंद पाडते. बुरशीच्या संसर्गानं बंद पडलेल्या केशनलिकांमुळे तिथल्या पेशी मृत पावतात. बुरशीमुळे झालेला हा आजार बरा करण्यासाठी 'अॅम्फोटेरिसिन-बी हे इंजेक्शन दिले जाते. त्याच्या किंमती खूप महाग आहेत. केशनलिका जर बंद झाल्या परिस्थिती गंभीर होते. त्यामुळे वेळेत उपचार घेतले पाहिजेत.’’

म्युकर मायकोसिस म्हणजे काय?

कुजलेल्या आणि दमट हवेत पडून राहिलेल्या वस्तूंवर बुरशी वाढते. तिचा संसर्ग झाला होणारा आजार म्हणजे ‘म्युकरमायकोसिस'. हा संसर्ग सायनस आणि डोळ्याच्या भागात होतो. तेव्हा नाक वाहने, चोंदणं, डोळ्यांतून पाणी येणे, चेहऱ्याला सुज, डोळे लाल होणे डोळ्यांना दोन प्रतिमा दिसणं अशी लक्षणं दिसतात. संसर्ग फुफ्फुसांना झाला तर छातीत दुखणं, खोकला येणं, ताप येणं अणि श्‍वास घ्यायला त्रास होणं, थुंकीतून रक्त पडणं, धाप लागणं ही लक्षणं असतात. त्वचेला झालेल्या जखमेतूनही बुरशीचा संसर्ग होतो. त्याच्या निदानासाठी एन्डोस्कोपी, एमआरआय आणि सीटी स्कॅन केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com