kolhapur news flower festival
kolhapur news flower festival

कोल्हापूर- चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फ्लॉवर फेस्टिव्हलचा शुभारंभ 

कोल्हापूर : विविधरंगी पाना-फुलांनी सजवलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई-महालक्ष्मीच्या आकर्षक दिमाखदार रथासह छत्रपती शाहु महाराजांवर अधारित देखाव्यासह ग्रामसंस्कृतीचे आणि लोक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या फ्लॉवर फेस्टिव्हल चित्ररथ रॅलीने परिसर दुमदुमुन गेला. 

कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पाच्या वतीने कोल्हापुरात आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य, अनोख्या फुलांचा उत्सव असलेल्या फ्लॉवर फेस्टिव्हल निमित्त महाराणी ताराबाई चौकातून या चित्ररथ रॅलीचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, पोलीस अधिक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, केएसबीपीचे प्रमुख सुजय पित्रे, राहुल कुलकर्णी, अंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, निर्मितीचे अनंत खासबागदार, शिरिष खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हल कार्निवल चित्ररथ रॅलीमधील विविध पानाफुलांनी सजविलेले विविध रथ, देखावे, ग्रामसंस्कृतीचे आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या देखाव्यांनी परिसर भारावुन गेला. या चित्ररथ रॅलीमध्ये विविध फुलांनी सजविलेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई-महालक्ष्मीचा रथ विशेष आकर्षण होते. या बरोबरच दिपमाळासह करवीर निवासिनी श्री अंबाबाई-महालक्ष्मीचा रथाचे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या रॅलीमध्ये डोळे दिपवणारे पाना-फुलांनी सजविलेले भव्य आणि आकर्षक हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचे दर्शन घडवण्यात आले.

ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या भव्य आणि आकर्षक बैलगाडीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारे धनगरी ढोल, महाराष्ट्र हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे आदिवासी नृत्य, जिल्हा परिषदेच्या राजर्षि शाहु छत्रपती निवासी क्रीडा प्रशालेचे विद्यार्थी-विद्यार्थींनी आकर्षक फ्लॉवर मास्क घालून पाहुण्यांचे स्वागत केले आणि रॅलीमध्ये उस्फुर्त सहभाग घेतला. या रॅलीमध्ये राजर्षि छत्रपती शाहु महाराजांचा देखावा, राष्ट्रध्वजाची प्रतिकृती, स्वच्छ भारत अभियानाचा लोगो, मेक इन इंडियाचा लोगो हेही सर्वांचे आकर्षण ठरले. महाराणी ताराबाई चौकातून निघालेली कार्निवल रॅली पुढे धैर्यप्रसाद चौक, पितळी गणपतीमार्गे पुढे पोलीस मुख्यालयासमोरील पोलीस उद्यानापर्यंत आली. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला यावेळी त्यांनी झांजपथकाच्या तालबद्ध वाद्यावर ठेका धरला. रॅलीतील सहभागी सर्वांनाच त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस उपाधिक्षक प्रशांत अमृतकर, माणिक पाटील-चुयेकर पणनचे विशेष लेखापरिषक बाळासाहेब यादव, विद्याप्रबोदनीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे, शहर वाहतुक विभागाचे निरिक्षक अशोक धुमाळ, अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी शहरातील नर्सरीचालक आणि नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com