एकाच कर्माचाऱ्यावर चालतंय सरकारी कार्यालय !

govt office
govt office

सोलापूर : सरकाची ऐवढी कार्यालये आहेत, की त्यातील अनेक कार्यालये कुठे आहेत, तिथे काय चालते हे सुद्धा अनेकांना माहिती नाही. त्यापैकीच क्षेत्रीय प्रचार निदेशालय सुचना और प्रसारण मंत्रालयाचे एक कार्यालय! विजापूर रस्त्यावर मनोरमा परिवारच्या मागे एका  फ्लॅटमध्ये हे कार्यालय सुरु आहे. अचानक तिथे तुम्ही गेला तर ते अक्षरक्ष: ते कार्यालय नसून कोण राहते की काय असे वाटेल. वर्षभरात आपले प्रोग्राम काय? याची माहिती सुद्धा येथील कार्मचाऱ्याला देता आली नाही. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या कार्यालयात फक्त एकच कर्मचारी हजर होता. 

स्मार्ट फोनच्या जमान्यात या कार्यालयाचे महत्त्व कमी झाले आहे. गावागावात टीव्ही नव्हता, तेव्हा हे कार्यालय ग्रामीण भागात जाऊन पडद्यावर चित्रपट दाखवत होते. आताही आमचा विभाग व्हीडीओ दाखवत असल्याचा दावा येथील कर्मचाऱ्याने केला. आम्ही या कार्यालयात गेलो तेव्हा फक्त एकच कर्मचारी तिथे हजर होता. माहिती देण्यास प्रथम त्यांनी टाळाटाळ केली. साहेब मुंबईला गेले असल्याचे सांगत बोलणंच टाळत, बाकीचे कर्मचारी फिल्डवर असल्याचे त्यांनी सांगितले. लाखो रुपये खर्च करुन सरकार अशी कार्यालये सुरु ठेवत आहे, पण यातून त्याचा उपयोग खरोखर नागरिकांना होतो का? हा खरा प्रश्‍न आहे. या कार्यालयाची गाडी अक्षरक्ष: धुळखात पडली आहे. आपल्याकडे काय यंत्रणा आहे याची माहितीही तेथील कर्मचाऱ्याला देता आली नाही. सर आज नाहीत. चावी नसल्याने यंत्रणा कशी दाखवायची असा प्रश्‍न त्यांनी केला. दोन दिवसात काय प्रोग्राम याची वरवरची माहिती त्यांनी सांगितली.  केंद्र सरकार अशा कार्यालयांवर वर्षाला कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. या कार्यालयाबाबत जनजागृतीच नसल्याने उद्देश कसा साध्य होणार हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एवढ्या मोठ्या कार्यालयात फक्त एकच कर्मचारी कसा, अशी अवस्था या कार्यालयाची असेल तर इतर अशा कार्यालयाचे काय स्थिती असेल याची शक्‍यता येते. 

स्वच्छता मोहिम सुरु 
क्षेत्रीय प्रचार निदेशालय सुचना और प्रसार मंत्रालय कार्यालयाच्या वतीने सध्या स्वच्छता मोहिमेवर काम सुरु आहे. बेटी बचाव, सुकन्या योजनाची जनजागृती व इतर सरकारचे काही कार्यक्रम जिल्ह्यात सुरु आहेत. कुरनुर, तिर्थ येथे कार्यक्रम झाले आहेत. दिंडोरे, कुंभारी, लिंबचिंचोळी येथे कार्यक्रम होणार असल्याचे या कार्यालयातील मल्टीशेसन राजकुमार यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com