पावसाने डांबरी रस्त्याचे 'गटार' ; तळेगाव  दिघे येथील चौफुली रस्त्याची दुरावस्था

हरिभाऊ दिघे
बुधवार, 19 जुलै 2017

तळेगाव मार्गे असलेल्या डांबरी रस्त्यांची किरकोळ पावसाने मोठी दुरावस्था झाली आहे. किरकोळ पावसाने रस्ता उखडतोय. सुमार दर्जाचे काम झालेल्या तळेगाव दिघे चौफुलीवरील डांबरी रस्त्याचे पावसाने अक्षरशा गटार बनले आहे. रस्त्यातील खडयांमध्ये पावसाच्या पाण्याचे डबके साचत आहेत.

तळेगाव दिघे(जि. नगर) : तळेगाव मार्गे असलेल्या डांबरी रस्त्यांची किरकोळ पावसाने मोठी दुरावस्था झाली आहे. किरकोळ पावसाने रस्ता उखडतोय. सुमार दर्जाचे काम झालेल्या तळेगाव दिघे चौफुलीवरील डांबरी रस्त्याचे पावसाने अक्षरशा गटार बनले आहे. रस्त्यातील खडयांमध्ये पावसाच्या पाण्याचे डबके साचत आहेत.

तळेगाव चौफुलीमार्गे असलेल्या संगमनेर - कोपरगाव व लोणी - नांदूरशिंगोटे दरम्यानचे डांबरी रस्ते भीज पावसाने ठिकठिकाणी उखडू लागले आहे. तळेगाव चौफुली परिसरात ऐन वर्दळीच्या ठिकाणी डांबरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या ठिकाणी अपघात होतात. खड्ड्यात पावसाचे पाणी साचून गटार बनते. दुरुस्तीसाठी सार्वजनिक बाधकाम विभागामार्फत अनेक महिन्यापूर्वी टाकलेली खडी तशीच पडून आहे. चौफुली रस्त्यावरील खड्डे वाहनधारक प्रवाशांना डोकेदुखी ठरले आहेत. त्यातच नगर - मनमाड रस्त्यावरील अवजड वाहतूक पुणतांबा फाटा, झगडेफाट्याकडून तळेगाव चौफुली मार्गे लोणीकडे वळविल्याचा फटकाही या रस्त्यास बसत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी तळेगाव चौफुली परिसरातील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा, युवक कार्यकर्ते मतीन शेख यांनी दिला आहे. 
 

Web Title: esakal news sakal news nagar news