छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

सोलापूर- मोहोळ तालुक्‍यातील नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने छेडछाडीला कंटाळून पेटवून घेऊन आत्महत्या केली.

ही घटना गुरूवारी पहाटे 5 च्या सुमारास घडली. गेल्या काही दिवसांपासून गावातील मुलाकडून तिची छेडछाड होत होती. त्या त्रासाला कंटाळून तिने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली.

महेश जाधव असे तिला त्रास देणाऱ्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: esakal news sakal news solapur news girl suicide