इचलकरंजी पालिका  कर्मचाऱ्यांचा संप स्थगित 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

सातवा वेतन आयोग लागू करण्यास मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्यामुळे 12 जुलैपासून तीन दिवसांचा पालिका कर्मचाऱ्यांचा संप पुढे ढकलण्यात आला आहे. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू करणे व इतर मागण्याच्या अंमलबजावणीसाठी वेळ देण्याची विनंती केली.

इचलकरंजी : सातवा वेतन आयोग लागू करण्यास मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्यामुळे 12 जुलैपासून तीन दिवसांचा पालिका कर्मचाऱ्यांचा संप पुढे ढकलण्यात आला आहे. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू करणे व इतर मागण्याच्या अंमलबजावणीसाठी वेळ देण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीनुसार नगरपरिषद कर्मचारी संघटनांनी सहकार्याची भूमिका घेतली असून संप पुढे ढकलण्याची निर्णय घेतला. 

नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत म्हणने बक्षी समितीसमोर मांडण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी संघटनांना मान्यता दिली. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व नगर परिषद कर्मचारी कृती समितीची बैठक झाली. त्यामध्ये संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीस ए.बी. पाटील, शिवाजी जगताप, के.के. कांबळे, नौशाद जावळे, सुनिल बेलेकर, दस्तगीर सादुले, विजय पाटील, चंद्रकांत कोठावळे, संजय शेटे, गणेश शिंदे, संजय कांबळे, प्रभावती फगरे, भानुदास देशमाने, अभिमन्यू कुरणे, रामचंद्र भिसे, दऱ्याप्पा परीट, अण्णाप्पा जाधव,कृष्णात गोंदुकुप्पे, सुरेश ठिकणे, सचिन घोरपडे, सुभाष आवळे, राजाराम आवळे, विश्‍वनाथ कुमठेकर, तुकाराम केंगार, किरण लाखे, सुनिल कांबळे आदी उपस्थित होते. 

Web Title: eskal news sakal news western maharashtra news ichalkaranji news