देश चांगला चालला असल्याचे पंतप्रधानांचे दुबळे समर्थन - पृथ्वीराज चव्हाण

सचिन शिंदे 
शुक्रवार, 11 मे 2018

नोटाबंदीचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यांनीच दिलेल्या एका अहवालात ते ही वस्तूस्थिती मान्य करतात. अशी स्थिती असूनही पंतप्रधान मोदी देश चांगला चालला आहे, याच दुबळ समर्थन करत आहेत. - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कऱ्हाड - देश फार मोठ्या संकटात आहे. मात्र तो चांगला चालला आहे, असे दुबळे समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, अशी टिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली. त्यांच्या पाटण काॅलनी येथील निवासस्थानी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

श्री. चव्हाण म्हणाले, नोटा बंदींचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यांनीच दिलेल्या एका अहवालात ते ही वस्तूस्थिती मान्य करतात. अशी स्थिती असूनही पंतप्रधान मोदी देश चांगला चालला आहे, याच दुबळ समर्थन करत आहेत. काँग्रेसच्या काळात केलेले काही करार त्यांनी रद्द केले मात्र त्याबाबत त्यांना स्पष्ट खुलासा करता आलेला नाही. भाजपचे अनेक लोक आत्ता तो पक्ष सोडून जात आहेत. त्यामागे अनेक कारण आहेत. ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा व शत्रुघ्न सिन्हा आज कऱ्हाड येथे येणार होते. सकाळी ते 8 वाजता येणार होते. मात्र काही अपरिहार्य कारणाने ते रद्द झाले. मात्र त्या सगळ्यांचा नारा मोदी हटाव देश बचाव असा आहे. म्हणून आम्ही त्यांना सोबत घेतले आहे. त्यांच्याकडून भाजपची आंदर की बात लोकांपुढे येणार आहे. 

ते म्हणाले, बुलेट ट्रेनचाच मुद्या घ्या. एक लाख कोटी 10 लाख आसपास त्याचा खर्च आहे. ती रक्कम कशी ठरली. त्याचा निविदा कोठे निघाली. असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यावर काहीही हालचाल नाही.  देशात भष्ट्राचाराच्या भाजप सध्या बॅकपूट आहे. त्यामुळे सार दाबून पुढ न्यायच चालू आहे. पारदर्शकता दाबून भ्रष्टाचाराला बळ दिले जात आहे. माहितीच्या अधिकाराखाली कोणतीही माहिती मागितली तरी त्याची माहिती मिळते हेच दुर्देव आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Ex CM Prithviraj chavan criticised PM Modi