जिकलो नसल्याने माझी लढाई अद्याप संपलेली नाही - प्रकाश आवाडे

पंडित कोंडेकर 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

इचलकरंजी - “माझी लढाई अद्याप संपलेली नाही. कारण मी अजून जिंकलेलो नाही. जोपर्यंत मी जिंकत नाही, तो पर्यंत मैदान सोडणार नाही“ अशा आक्रमक शब्दात माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी आगामी विधान सभा निवडणूकीचे एकप्रकारे रणशिंग फुंकले. 

इचलकरंजी - “माझी लढाई अद्याप संपलेली नाही. कारण मी अजून जिंकलेलो नाही. जोपर्यंत मी जिंकत नाही, तो पर्यंत मैदान सोडणार नाही“ अशा आक्रमक शब्दात माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी आगामी विधान सभा निवडणूकीचे एकप्रकारे रणशिंग फुंकले. 

येथील इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह यंत्रमाग उद्योगाबाबत शासनाच्या उदासिन भूमिकेवर जोरदार हल्ला चढविला. 

तत्पूर्वी, आगामी विधानसभा निवडणूकीत श्री. आवाडे यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार अनेक यंत्रमागधारकांनी मनोगतातून व्यक्त केला. त्याच्या संदर्भ घेवून श्री.आवाडे यांनी या भावना व्यक्त केल्या.

श्री.आवाडे म्हणाले, “संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये मी निवडणूक लढविण्याचा नविन मुद्दा आला आहे. यापूर्वी ही लढलो आहे. पण ऐनवेळी कांही तरी विषय तयार होतात. त्याचा फटका बसतो. आता तुम्हालाही फटका बसल्याची जाणीव होत आहे.“

यंत्रमाग उद्योगाबाबत बोलतांना श्री. आवाडे म्हणाले, “सध्या यंत्रमाग उद्योगासमोर प्रचंड संकट आहे. पण जबाबदार लोकांनी याकडे पाहिलेले नाही. मी जरा यंत्रमाग उद्योगाचे प्रश्‍न मांडले तर विरोधकांना लगेच त्रास सुरु होतो. यंत्रमाग भंगारात जात आहेत. पटत नव्हते म्हणून जावून सहज भंगार गोदामात पाहणी केली. त्याचे वृत्त आल्यानंतर विरोधकांना झोंबले.“

भंगारातील यंत्रमागावरुन विरोधकांना आव्हान
चायना रॅपीयर लूम आणल्यामुळे जुने यंत्रमाग भंगारात घातल्याचा खुलासा विरोधकांनी केला आहे. जुने यंत्रमाग भंगारात घालून नविन चायना रॅपीयर यंत्रमाग घातले आहेत, तो यंत्रमागधारक दाखवावा, या संदर्भात चुकीचा खुलासा करणार्‍यांचा सत्कार करतो, असे आव्हान श्री.आवाडे यांनी विरोधकांना दिले.

Web Title: Ex Minister Prakash Awade comment