esakal | ...यासाठीच घेतला आवाडेंनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

...यासाठीच घेतला आवाडेंनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय

इचलकरंजी - कार्यकर्त्यांच्या विश्‍वासावर यापुढेही काँग्रेस पक्षाला सोडून राजकारण करण्याचा घेतलेला निर्णय हा गावाच्या विकासासाठी आहे. यापुढे जशी वेळ येईल, तसा राजकीय निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आज येथे केली.

...यासाठीच घेतला आवाडेंनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - कार्यकर्त्यांच्या विश्‍वासावर यापुढेही काँग्रेस पक्षाला सोडून राजकारण करण्याचा घेतलेला निर्णय हा गावाच्या विकासासाठी आहे. यापुढे जशी वेळ येईल, तसा राजकीय निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आज येथे केली.

श्री. आवाडे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुपारी येथील उत्तम चित्रमंदिर या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजीत केला होता. त्यामध्ये त्यांनी भूमिका स्पष्ट केली. गेल्या दहा वर्षात इचलकरंजीची झालेली अधोगती भरुन काढून पून्हा गाव एकनंबर करण्याचा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

पदाचा राजीनामा देवून श्री. आवाडे यांनी आज जिल्ह्याच्या राजकारणात भूकंप निर्माण केला. त्यानंतर दुपारी कार्यकर्त्यांचा तातडीचा मेळावा आयोजीत केला होता. मेळाव्यात बाळासाहेब कलागते, सतिष कोष्टी, विलास गाताडे, राजगोंडा पाटील, अहमद मुजावर, प्रकाश मोरे, अशोक सौंदत्तीकर, मुकूंद पोवार आदींनी मनोगत व्यक्त केले.

प्रकाश आवाडे यापुढे जी राजकीय भूमिका घेतील, त्यामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते अत्यंत निष्ठेने त्यांच्या सोबत राहू, असा विश्‍वास व्यक्त करुन पुढील ध्येय धोरण ठेवून आवाडे गटाने घेतलेली भूमिका अत्यंत योग्य असल्याचे समर्थन यावेळी कार्यकर्त्यांनी केले. 

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, काँग्रेसच्या पडत्या काळात आम्ही नेहमीच निष्ठेने राहिलो. मात्र गेल्या दहा वर्षात गावाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशा वेळी गावच्या भल्यासाठी माझ्या तत्वाला मुरड घालून प्रकाश आवाडे यांना स्वतंत्र विचार करण्यास परवानगी दिली. यामागे खूप मोठा त्याग केला असून यापुढील काळात विधान सभेत कार्यकर्त्यांनी इर्षेने काम करुन प्रकाश आवाडे यांना पून्हा एकदा काम करण्याची संधी द्यावी.

प्रकाश आवाडे म्हणाले, ""गेली अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. गावांसाठी एक उमेदवार म्हणून माझी सर्वांनी निवड केली आहे. कार्यकर्त्यांच्या 100 टक्के विश्‍वासावर व त्यांच्या बळावर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढील काळात जशी वेळ येईल तसा योग्य निर्णय घेवून शहराच्या विकालास चालना देण्याचा प्रयत्न राहिल.""

व्यासपिठावर प्रकाश दत्तवाडे, प्रकाश सातपूते, जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे, बाबासाहेब पाटील, अशोक आरगे, पंचायत समिती सदस्य महेश पाटील, सुधाकर मणेरे आदींची उपस्थिती होती. आभार शामराव कुलकर्णी यांनी मानले. 

"जयभवानी, जयशिवाजी" घोषणा 
आवाडे यांच्या उपस्थितीत गेली अनेक वर्षे काँग्रेसचा मेळावा झाला. आजच्या मेळाव्यात मात्र आवाडे गटाकडून "जय भवानी, जय शिवाजी" अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे भविष्यात आवाडे गट कोणत्या राजकीय पक्षात जाणार याचे अंदाज कार्यकर्ते बांधतांना दिसत होते. 

loading image
go to top