
चार दिग्गज नेत्यांचे मूळ गाव असल्याने कोणत्या पक्षाची सत्ता येणार, याकडे लक्ष लागले आहे.
आजी-माजी मंत्र्यांच्या लढतीकडं लक्ष
एकसंबा : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १७ प्रभागांतून ४० उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी (ता. २७) मतदान असून ३० डिसेंबरला निकाल जाहीर होईल. भाजपचे मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी या चार दिग्गज नेत्यांचे मूळ गाव असल्याने कोणत्या पक्षाची सत्ता येणार, याकडे बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा: शिवसेनेची सूत्रं नव्या नेत्यांच्या हातात; दोन बडे नेते बाजूला
एकसंबा नगरपंचायतसाठी शनिवारी (ता. १८) ४४ पैकी केवळ ४ उमेदवारांनी माघार घेतली असून भाजप, काँग्रेस आणि अपक्ष असे ४० उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक मुख्यतः हुक्केरी आणि जोल्ले गटात आहे. पक्षाकडून दिवस-रात्र धावपळ करत मतयाचनेसाठी लोकांना विनवण्या करतानाचे चित्र आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून उमेदवारासाठी जिंकण्याचा खटाटोप चालला आहे. येणाऱ्या नूतन २०२२ च्या वर्षात कोणत्या पक्षाचा झेंडा राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
दोन्ही गटांना निवडणूक प्रतिष्ठेची
एकसंबात हुक्केरी व जोल्ले गट पूर्वीपासूनच सक्रिय आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यांनी नगरपंचायतीवर सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. परिणामी शहरात प्रचार सभा तसेच गाठीभेटीतून प्रचाराचा धुरळा उडत आहे. निवडणूक होणाऱ्या १७ प्रभागांतून अंतर्गत राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
निवडणूक दृष्टिपथात
प्रभाग १७
पुरुष ६,७३९
महिला ६,७६६
नवे मतदार १२०२
एकूण मतदार १३, ५०५
हेही वाचा: Banda Political News: राणेंनी समजूत घालताच बांदेकरांनी घेतला अर्ज मागे
Web Title: Ex Mla Annasaheb Jolle Prakash Hukkeri Election Run In Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..