
आटपाडी : एका खासगी कंपनीत अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडून १५ लाख ९७ हजारांना फसवल्याचा प्रकार घडला आहे. पतंगराव गोविंद कदम (वय ४२, पिंपरी खुर्द) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे. मल्लेश धुडाप्पा माळी आणि माधुरी मल्लेश माळी दोघेही (झाडगल्ली, गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.