माजी विद्यार्थींनी भागवली शाळेची तहान

वसंत कांबळे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

ढवळस ता. माढा येथील जगदंबा विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याप्रसंगी जल शुद्धीकरण प्लॅन्ट विद्यालयास सप्रेम भेट देऊन सध्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शुद्ध पाण्याची तहान भागवली आहे.

कुर्डु (सोलापूर) - ढवळस ता. माढा येथील जगदंबा विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याप्रसंगी जल शुद्धीकरण प्लॅन्ट विद्यालयास सप्रेम भेट देऊन सध्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शुद्ध पाण्याची तहान भागवली आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सक्सेस फायर सिस्टीम लि. पुणेचे अध्यक्ष व या शाळेचे माजी विद्यार्थी संजय उरमोडे हे होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अरुण टोणपे, बालाजी कोलते, इत्यादी उपस्थित होते.

आपण शिकलेल्या शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने 1996 च्या इयत्ता 10 वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे संघटन पुणे येथे कार्यरत असणारे संजय उरमोडे यांनी केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यावर आपल्याला आपल्या शाळेला काय आवश्यकता आहे याची चर्चा करून सर्वानुमते अत्याधुनिक पद्धतीचा जलशुद्धीकरण प्लांट शाळेतील एका खोलीमध्ये तयार करून सर्वांच्या उपस्थितीमध्ये शाळेला अर्पण करण्यात आला. यापुढेही शाळेसाठी स्टेज व आवश्यक बाबी आम्ही 1996च्या माजी विद्यार्थ्याकडून देण्याचा प्रयत्न करू असे अनेकांनी  मनोगतामध्ये व्यक्त केले.

दहावीनंतर प्रथमच एकत्रित आलेल्या मित्रांनी एकमेकाची चौकशी करून सध्या काय करत आहेत, कसे आहे याची विचारपूस करून या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी, अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संतोष काळे सचिन चव्हाण दसरथ राक्षे कांतीलाल घळके रामलिंग पवार बळीराम शिंदे रमेश सातपुते गणेश अंकुश सचिन पवार देविदास गव्हाणे सिद्धू काळे, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी शाळेच्या वतीने देणगी दिलेल्या.

Web Title: Ex-students helps water supply to school