माजी विद्यार्थ्यांच्या प्रेमाने भारावले शिक्षक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

कोल्हापूर - जीवन देणारा जसा महत्त्वाचा असतो, तसाच जीवन घडविणाराही... तुम्ही आमच्या आयुष्याचे मूर्तिकार आहात... तुम्ही घाव घातले म्हणूनच आमचे आयुष्य घडले. पैसे नसल्यामुळे केस वाढलेली मुले, फाटकी पुस्तके, फाटक्‍या विजारी अशा दुर्बल घटकांतील मुलांना तुम्ही आधार दिलात आणि जगण्याचा मार्ग दाखविलात म्हणूनच आमचे आयुष्य चांगले घडले, अशा भावना गुरुवारी व्यक्त झाल्या.

निमित्त होते मुंबईतील विलेपार्ले परिसरातील छत्रपती शिवाजी विद्यालयातील मार्च 1987 च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी मेळाव्याचे. जुन्या आठवणींना उजाळा देताना शिक्षक व विद्यार्थ्यांचेही डोळे पाणावले.

हा योग जुळवून आणला तो 1993 च्या बॅचने. त्यांनी त्या काळातील मुख्याध्यापिका सरोज ऊर्फ माई पाटील यांच्यासह सर्व निवृत्त शिक्षक व विद्यार्थ्यांना एकत्र आणले. हा सोहळा अत्यंत देखणा झाला. फुलांनी नटलेले प्रवेशद्वार, 25 वर्षांचे ऋणानुबंध रांगोळी, रेड कार्पेट हे सर्व गुरुजनांबद्दल असलेल्या नि:स्सीम प्रेमाचे प्रतीक होते. प्रत्येक शिक्षकास ऋणानुबंध बोधचिन्ह देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

मुख्याध्यापिका पाटील म्हणाल्या, ""या वयात तुम्ही आम्हा शिक्षकांना जगण्याची ऊर्जा दिली. विद्यार्थी हीच शिक्षकाची खरी संपत्ती असते. या शाळेने दोन आमदार, सहा-सात नगरसेवक याशिवाय देशाच्या सीमेवर लढणारे जवान आणि उत्कृष्ट मल्लखांबपटू व तंत्रज्ञही दिले.''

Web Title: ex students reunion teacher