इस्लामपूर : पंधरा मे २०२५ पासून सुरू होऊन सप्टेंबर २०२५ पर्यंत झालेल्या सततच्या पाऊस, अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतात पाणी साचले. ढगाळ हवामान व वाढलेली आर्द्रता यामुळे कठीण ऊस पिकावरही परिणाम झाला आहे. .उसाची वाढ खुंटल्याने व वजन घटल्याने ऊस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. नवीन ऊस लागवडीवरही परिणाम झाला हे. वाढलेला उत्पादन खर्च, घटणारे उत्पादन यामुळे ऊस पट्ट्यात चिंतेचे वातावरण आहे. .Sangli News: बछड्यांची आईपासून ३६ तास ताटातूट ! कापरीतील उसात पुन्हा ‘त्या’ बिबट्याची बछडी; ऊसतोडी रखडल्या...पंधरा मेपासून सुरू झालेला पाऊस सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरू राहिला. शेतातील पाणी कायम राहिले. खरीप पिकांचे नुकसान झाले. ऊस शिल्लक राहिला. मात्र, ऊस पिकातही पाणी साचल्याने वाढीवर परिणाम दिसला. .उसाच्या पांढऱ्या मुळांची वाढ खुंटल्याने जमिनीतून अन्नद्रव्ये शोषून घेण्याची प्रक्रिया थांबली. परिणामी उसाची पुरेशी वाढ झाली नाही. उसासाठी लागणाऱ्या खतांच्या दराने गगनाला भिडले आहे. तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खते खरेदी करून उसाला टाकली. एवढा खर्च करूनही ऊसाची वाढ न झाल्याने वजनात घट झाली आहे. .Sangli News : कचरा वाहने, आपत्कालीन सेवा व पाणी टँकर्सवर रिअल-टाइम ट्रॅकिंग, प्रशासनाला मिळेल त्वरित माहिती.प्रतिगुंठा दोन ते अडीच टन उत्पादन मिळणाऱ्या शेतात यंदा एक ते दीड टन ऊस भरत आहे. १५ मेपासून सुरू झालेला पाऊस सप्टेंबरच्या अखेरपर्यंत सुरू राहिल्याने उसाची आडसाली, पूर्वहंगामी, सुरू लागवडही ठप्प झाली. बहुतांश शेतकऱ्यांचा कल चांगले उत्पादन मिळावे म्हणून आडसाली ऊस लागवडीकडे असतो. .परंतु यावर्षी सतत होणाऱ्या पावसामुळे शेतातील पाणी न गेल्याने हंगामच संपून गेला. शेतकऱ्यांनी वापसा मिळेल तसा ऊस लावण्याचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे उत्पादन मिळेल, की नाही याबाबत शेतकरी साशंक आहेत. शेतात साचलेले पाणी, ढगाळ हवामान आणि अधिक आर्द्रतेमुळे काही ठिकाणी उसावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. .विशेषतः २६५ जातीवर पानांवर तपकिरी ठिपके, तर ९२००५ व १०००१ जातींवर तांबेरा जास्त प्रमाणात दिसत आहे. लोकरी मावा, तांबेराच्या प्रादुर्भावामुळे खोडवा व गाळपास जाणाऱ्या क्षेत्रांवर परिणाम झाला. यंदाच्या ऊस लागवडीवरही या रोगांचा परिणाम जाणवत आहे. अतिपावसामुळे उसाचे टनेज घटलेय. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन मिळत आहे. .प्रतिगुंठा दोन ते अडीच टन उत्पादन मिळत असे. यावर्षी फक्त एक ते दीड टन ऊस मिळत आहे. फायदा तर मिळतच नाही, उलट आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. - विश्वास पाटील, ऊस उत्पादक, नेर्ले यावर्षी सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले. मुळांची वाढ खुंटून वाढ थांबली. उत्पादनात घट दिसत आहे. .उपाय म्हणून शेतकऱ्यांनी नवीन लागवडीपूर्वी जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे. परीक्षण अहवालानुसार हिरवळीची खते, शेणखत आणि आवश्यक तेवढेच रासायनिक खते वापरावीत. उसाच्या खोडवा-पाचटीचे व्यवस्थापन करून अॅझोटोबॅक्टरचा वापर करावा..जिवाणू खते बिजप्रक्रियेच्या वेळी वापरावीत. - इंद्रजित चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, वाळवा गाळपास जाणारे ऊस क्षेत्र-वाळवा (हेक्टर) एकूण क्षेत्र : २९ हजार ०६३. आडसाली : १४ हजार ९३४. पूर्व हंगाम : २ हजार ८८०. सुरू : १ हजार ८००. खोडवा : ९ हजार ४४९..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.