सांगली : आळसंदमध्ये जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट 

सांगली : आळसंदमध्ये जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट 

विटा - आळसंद ( ता. खानापूर ) येथे आज पहाटे जमिनीत पुरून ठेवलेल्या जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाला. मात्र त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या स्फोटाने एक किलोमीटरचा परिसर हादरला. आवाजाने मात्र ग्रामस्थ भयभीत झाले. वीस ते बावीस जिलेटीनच्या कांड्याचा हा स्फोट असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

येथील बारबट्टे वस्तीवरील एका शेतकऱ्याचे विहीर खुदाईचे काम सुरू आहे. त्यांनी त्यासाठी जिलेटीनच्या कांड्या आणल्या होत्या. त्या तेथेच जमिनीत पुरून ठेवल्या होत्या. आज पहाटे त्यांनी शेतातील पालापाचोळा गोळा करून पेटविला. त्याच्या ज्वाला जिलेटीनच्या कांड्यांना लागताच कांड्या फुटून मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एक किलोमीटरपर्यंत गेला. झालेल्या आवाजामुळे लोकांमध्ये घबराहट पसरली. काय झाले या भीतीने काही ग्रामस्थ घराबाहेर आहे. जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट असल्याचे समजताच ग्रामस्थांनी मात्र सुटकेचा निश्वास टाकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com