बनावट दारू बनवणाऱ्यांचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

सांगली - विदेशी दारूच्या बाटल्यात "गोवामेड' ओतून वरून हुबेहूब टोपण लावून राजरोस विकणाऱ्या चौघांना राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने अंकली (ता. मिरज) येथे अटक केली. एक लाखाची गोवामेड दारू, रिकाम्या बाटल्या, टोपणे आणि मोटार असा 5 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मुख्य सुत्रधार सुनील कृपाशंकर दुसाद (वय 26), श्रीकांत देवीदास टर्ले (वय 29, सोनारपाडा, कल्याणशिळ रस्ता, डोंबिवली पूर्व, मुंबई), प्रवीण सुंदर शेट्टी (वय 31, 16 वी गल्ली, जयसिंगपूर), नविन शाम शेट्टी (वय 50, जयसिंगपूर) यांना अटक केली.

याबाबत उत्पादन शुल्कमधून मिळालेली माहिती अशी, मुंबईतील सुनील दुसाद व श्रीकांत टर्ले याने दोन महिन्यांपासून बनावट दारू निर्मितीचा उद्योग सुरू केला होता. जयसिंगपूर येथील हॉटेल आर्या परमिटरूमचा चालक प्रवीण शेट्टी आणि हॉटेल गणेश परमिट रूमचा चालक नविन शेट्टी यांना हाताशी धरून बनावट दारू बनवून विकली जात होती.

बॅगपायपर व्हिस्की, मॅकडोनाल्ड नं. 1 व्हिस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की, इंपेरियल ब्लू, डीएसपी ब्लॅक या ब्रॅंडच्या बाटल्या गोळा करून त्यात गोवामेड ओतून वरून हुबेहूब टोपण लावून विकली जात होती. गोवामेड 750 मिलीची बाटली 80 रुपयात मिळते. त्यांचा वापर करून 180 मिलीच्या चार बनावट बाटल्या तयार केल्या जात.

दरम्यान, अंकली फाट्यावर दोन दिवसांपूर्वी सुनील दुसाद व श्रीकांत टर्ले हे मोटारी (एमएच 05 सीव्ही 2435) मधून निघाले होते. राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक सुरेश चौगुले, सहायक दुय्यम निरीक्षक संतोष थोरात यांच्या पथकाने मोटार थांबवली. आत गोवामेड दारूचा साठा, बनावट दारूच्या बाटल्या, विदेशी कंपन्यांच्या नावाची टोपणे मिळाली.

गोवामेडपासून विदेशी बनवत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवीण, नविन शेट्टीकडे दारूसाठा असल्याचे सांगितल्यानंतर दोघांना अटक केली. मोटार, एक लाखाची गोवामेड विदेशी दारू, 18 बनावट दारूबाटल्या, 655 टोपणे आणि इतर साहित्य असा 5 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौघांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर 25 नोव्हेंबरपर्यंत कोठडी मिळाली. विभागीय उपायुक्त श्रीमती संगीता दरेकर, अधीक्षक प्रकाश गोसावी, उपाधीक्षक व्ही. डी. टिकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चौगुले, प्रभारी निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक सुरेश पाटील, दत्ता चव्हाण, माधव चव्हाण, काशिनाथ मंडले, सहायक दुय्यम निरीक्षक संतोष थोरात, बी. एस. हिप्परकर, युवराज कांबळे, संतोष बिराजदार, जवान श्रीपाद पाटील, उदय पुजारी, दिलीप ऐनापुरे, मीना देवल, संगीता माळकोटी, वसंत घुगरे यांनी कारवाई केली.

बनावट विदेशी दारू विकणाऱ्या चौघांना अटक करून सांगलीच्या पथकाने मोठी कामगिरी केली. त्याची दखल घेत त्यांना बक्षीस दिले जाईल. प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हुबेहूब टोपण कोठे बनवले गेले, त्याचा तपास केला जाईल.
- संगीता दरेकर, विभागीय उपायुक्त.

Web Title: expose fake alcohol making