esakal | रिक्षाचालकांना वैद्य कागदपत्रे, फिटनेस तपासणीला मुदतवाढ द्या 

बोलून बातमी शोधा

Extend medical documents, fitness check to rickshaw pullers

रिक्षाचालकांना रोजगार मिळेना, रोजगाराअभावी रिक्षाचालकांना आपल्या कुटुंबासह उपासमारीचा सामना करावा लागत आहे. यामुळे वैध कादपत्रे आणि फिटनेस तपासणीची मुदत तीन महिने न ठेवता 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ करण्याची मागणी राज्य रिक्षा चालक संघटनांनी कोल्हापुरातील मुख्य परिवहन अधिकऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

रिक्षाचालकांना वैद्य कागदपत्रे, फिटनेस तपासणीला मुदतवाढ द्या 
sakal_logo
By
शंकर भोसले

मिरज : कोरोना संसर्ग रोगाने जगभरात थैमान घातले आहे. या संसर्गजन्य साथीमुळे लोक भयभीत झालेले आहेत. परिणामी रिक्षाचालकांना रोजगार मिळेना, रोजगाराअभावी रिक्षाचालकांना आपल्या कुटुंबासह उपासमारीचा सामना करावा लागत आहे. यामुळे वैध कादपत्रे आणि फिटनेस तपासणीची मुदत तीन महिने न ठेवता 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ करण्याची मागणी राज्य रिक्षा चालक संघटनांनी कोल्हापुरातील मुख्य परिवहन अधिकऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊन शिथिलतेनंतर रिक्षाचालक जगण्यासाठी व कुटुंब जगवण्यासाठी धडपड सुरू आहे. यामध्येच रेल्वे बस खासगी बसेस या गाड्याची संख्या देखील घटली आहे. परिणामी यावरच रिक्षा चालकांचे पोट अवलंबून आहे. यामुळे शासनाने रिक्षांची वैध कागदपत्रे व फिटनेस तपासणी मुदत 30 जून 2021 अशी तीन महिने न करता 31 डिसेंबर 2021 अखेर मुदतवाढ मिळावी. तसेच मोटार वाहन संवर्गातील ऑटो रिक्षा वाहनांची वाढीव नोंदणी शुल्क व फिटनेस विलंबास दररोज 50 रुपये दंड आकारू नये अशी हरकत केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या परिवहन व रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे नोंद केली आहे. 

यावेळी सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश चौगुले, रफिक खतीब, अरिफ शेख, मोसिन पठाण, संभाजी ब्रिगेड रिक्षा संघटनेचे शिवाजी जाधव, रशीद शेख, राजू जाधव सांगली जिल्हा विद्यार्थी वाहतूक रिक्षा पंचायतचे राजू रसाळ, प्रकाश चव्हाण, अजित नाईक, सुखदेव कोळी, शाहीर फडतरे, संताजी ठोंबरे आदी उपस्थित होते. 


संपादन : प्रफुल्ल सुतार