"कडबाकुट्टी'तील जादा पैसे शेतकऱ्यांच्या घरपोच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - पशुधन योजनेतील "कडबाकुट्टी'तील गैरकारभाराबाबत "सकाळ'मध्ये बातमी प्रसिद्ध होताच अधिकाऱ्यांची झोपच उडाली. बातमी प्रसिद्धीनंतर आज जादा जमा केलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या घरपोच केली. ग्रामपंचायत सदस्य भगवान रजपूत यांना मोबाइलवरून तोंडी हिशेब दिला आहे. त्याचीही खातरजमा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून करणार असल्याचे रजपूत यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक टळली.

पशुधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कडबाकुट्टी मशीन देण्याची योजना होती. त्यामध्ये पन्नास टक्के रक्कम घेऊन शेतकऱ्यांना मशीन देण्यात येणार होते. यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीच्या नावे डी.डी. काढायचा होता. याच पद्धतीने जिल्ह्यातील राधानगरी वगळता इतर तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना थेट डी. डी. (डिमांड ड्राफ्ट) काढण्यासाठी सांगितले; मात्र कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांकडून रोख रक्कम जमा केली. शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांत माहिती घेतली असता मशिनच्या किमतीपेक्षा अधिक रोख रक्कम जमा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती शेतकऱ्यांद्वारे "सकाळ'पर्यंत पोचली. आम्ही याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन वस्तुस्थितीची माहिती घेतली तेव्हा अधिकाऱ्यांनी रोख रक्कम घ्यायचे कारण नाही, डी. डी. काढण्याच्या सूचना आहेत. तरीही असे कोणी अधिकाऱ्यांनी केले असल्यास कारवाई करू, असे जिल्हा परिषदेतील पशुधन विभागाचे श्री. शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

याबाबतची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच आज प्रत्येकी दीडशे रुपये घरपोच देऊन अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य रजपतू यांना तोंडी हिशेब सांगितला; मात्र या हिशेबात सुद्धा गैरमेळ असून, नको ते जादा पैसे घेतल्याचा संशय आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्याचा हिशेब विचारणार असल्याचेही रजपूत यांनी सांगितले.

Web Title: Extra money of kadbakutti is in farmers home