कर्नाटक पोलिसांची दादागिरी!  मराठी भाषेचे व्हाट्‌ऍपवर स्टेटस ठेवले म्हणून तीन युवकांना अमानुष मारहाण 

Extremely inhuman beating of three youths at Machhe belgaum police crime marathi news
Extremely inhuman beating of three youths at Machhe belgaum police crime marathi news

बेळगाव : मराठी भाषीकांना नेहमी पाण्यात पाहणाऱ्या निर्दयी कर्नाटक पोलिसांनी आता अमानुषपणाची परिसीमा गाठली आहे. व्हाट्‌ऍपवर स्टेटस ठेवल्याचा ठपका ठेवत मच्छे येथील तीन युवकांना अत्यंत अमानुष मारहाण केली आहे. पट्ट्याने तसेच लाठ्याकाठ्यानी बेदम मारहाण करण्यात आल्याने त्यांच्या अंगावर काळे, निळे व्रण उटले आहेत. जखमी युवकांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलिसांच्या या कृत्याचा सर्वत्र निषेध व्यक्‍त करण्यात येत आहे.

 महापालिकेसमोर बेकायदा उभारण्यात आलेल्या लाल पिवळ्या ध्वजामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बेकायदा ध्वज हटविण्यात यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पायऱ्या झिजविण्यात आल्या. मोर्चाही काढण्यात आला पण, अद्यापही ध्वजाबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच शुक्रवार (ता.12) कोनवाळ गल्लीत शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर करवेच्या गुंडानी भ्याड हल्ला केला. या घटनेचे तिव्र पडसाद सीमाभागासह महाराष्ट्रात उमटले.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून मराठी भाषीकांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. पण, याला देखील कर्नाटक पोलिसांकडून आक्षेप घेण्यात येत आहे. आक्षेपार्ह मजकूर व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि स्टेट्‌सवर ठेवल्याने शहराच्या कायदा आणि सुव्यस्थेला धक्‍का पोहचू शकतो. असा जावई शोध लावत ग्रुप ऍडमीन आणि सभासदावर गुन्हे दाखल करुन घेण्यात आले आहेत. स्टेटस ठेवल्याचा रागातून दोन दिवसापुर्वी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी मच्छे येथील तीन युवकांना उचलून ठाण्यात आणले. चौकशीच्या नावाखाली त्यांना पठ्ठ्याने व लाठ्या काठ्यानी अमानुष मारहाण केली.

हातावर, बोटावर पाठीत, पायावर बेदम मारहाण करण्यात आल्याने अंगावर काळे निळे व्रण उटले आहेत. तसेच त्यांचे मोबाईल देखील काढून घेण्यात आले आहेत. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्याकडे धाव घेताच त्यांना सोडून देण्यात आले. मारहाण झालेले त्यांचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. पोलिसी कारवाईच्या भीतीने सदर युवक घरातून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय देखील चिंतेत सापडले आहेत. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

जखमी युवकांचे फोटो आपण पाहिले आहेत. पण, त्यांना पोलिसांनीच मारहाण केली आहे की त्यांच्या त्यांच्यात हाणामारी झाली आहे. हे कसे समजणार. पोलिसांनी मारहाण केली असल्यास संबधीतानी आपल्याकडे रितसर तक्रार करावी. त्याची चौकशी केली जाईल. तोपर्यंत आपणाला काही करता येणार नाही.

डॉ. के. त्यागराज, पोलिस आयुक्‍त 

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com